शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

अमरावती येथे २,३५० वाहन चालकांनी केला मोटार वाहन कायद्याचा भंग, RTOच्या भरारी पथकाची कारवाई

By गणेश वासनिक | Updated: July 16, 2023 16:07 IST

Amravati: वाहनचालकांचे अनेक माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे. तरीही वाहनचालक पाहिजे त्या प्रमाणात वाहन चालविण्याबाबत व वाहनाचे विधीग्राह्य कागदपत्रे जवळ न बाळगता मोटार वाहन कायदा व नियमाचे सर्रास उल्लंघन करतात.

- गणेश वासनिकअमरावती -  वाहनचालकांचे अनेक माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे. तरीही वाहनचालक पाहिजे त्या प्रमाणात वाहन चालविण्याबाबत व वाहनाचे विधीग्राह्य कागदपत्रे जवळ न बाळगता मोटार वाहन कायदा व नियमाचे सर्रास उल्लंघन करतात. त्यानुसार जून महिन्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीवरून २,३५० वाहन चालकांनी मोटार वाहन कायदा व नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे.जून महिन्यात २,३५० वाहन चालकांकडून दंडात्मक कारवाईत एकूण रुपये ३७ लाख ६७ हजार दंड स्वरुपात रक्कम वसूल करण्यात आली आहे.

समुपदेशन केल्यानंतर वाहनचालक परत परत मोटार वाहन कायदा / नियमाचा भंग करत असतील तर त्यांना न्यायालयीन व दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागते. प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागडी तसेच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक हितेश धावडा, दिनेश सुरडकर, गणेश वरुटे व प्रताप राऊत यांनी ही कारवाई केली.

...असे केले वाहन चालकांनी या नियमांचे उल्लंघन१) हेल्मेट -६३१२) वाहनाला परावर्तीत टेप न लावलेली वाहने -११२३) वाहनाच्या छतावरून सामान वाहून नेणारी वाहने -१४) ओव्हर डायमेन्शन वाहने -१०५) शाळेत मुलांना घेऊन जाणारी वाहने- ४६) हॉर्न / सायरनचे उल्लंघन करणारी वाहने- ३७) वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणारे वाहन चालक -१८८) वाहन चालविताना लायसन जवळ न बाळगणारे वाहनचालक - ४२००९) चालकांचे लायसन / अनुज्ञप्ती विधीग्राह्यता संपलेले वाहनचालक-३०१०) वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र सादर न केलेली वाहने - ११११) फिटनेस प्रमाणपत्राची विधी ग्राह्यता संपलेली वाहने-१९३१२) विमा प्रमाणपत्र सादर न केलेली वाहने -६८१३) विमा प्रमाणपत्राची मुदत संपलेली वाहने - १५३१४) वाहनाचे परमिट सादर न केलेली वाहने -०८१५) परमिटची विधीग्राह्यता संपलेले वाहने -२२१६) भार क्षमतेपेक्षा अधिक मालवाहून नेणारी वाहने-१२१७) पीयूसी प्रमाणपत्र सादर न केलेली वाहने- ६०१८) पीयुसीची विधी ग्राह्यता संपलेली वाहने - १६९१९) वाहनांच्या नंबर प्लेटवर वाहन क्रमांक नसलेली वाहने-१२३२०) वाहनाची कागदपत्रे सादर न केल्याने अटकावून ठेवलेली वाहने - १२२१) इतर नियमांचा भंग / उल्लंघन केलेली वाहने-२९०

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAmravatiअमरावती