शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
5
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
6
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
7
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
8
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
9
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
10
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
11
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
12
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
13
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
14
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
15
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
16
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
17
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
18
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
19
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
20
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव

२.३४ कोटींचा घोटाळा एफआयआर केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

बडनेरा झोनमध्ये ४०० हून अधिक लाभार्थींच्या नावाने ७५ लाखांच्या तीन बनावट नस्तीचा प्रकार आयुक्तांच्या निदर्शनास आल्यानंतर उपायुक्तांनी केलेल्या चौकशीतील लेखी जबाबात अधिकाऱ्यांनी आपली स्वाक्षरी नसल्याचे स्पष्ट करीत हात वर केले होते. या प्रकरणात लेखा विभागातील लिपिक अनुप सारवान व बडनेरा झोनचा कंत्राटी संदीप राईकवार यांच्याविरुद्ध तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

ठळक मुद्देवैयक्तीक शौचालय : बनावट नस्ती प्रकरणातील ‘मास्टरमार्इंड’ पसार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा झोनमध्ये झालेल्या वैयक्तिक शौचालय बांधकामाच्या ७५ लाखांच्या बनावट नस्ती प्रकरणात अटकेतील दोघांचा साथीदार योगेश कावरे (रा. बडनेरा) हाच ‘मास्टरमार्इंड’ असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तशी माहिती आरोपींनी दिल्यानंतर पोलिसांनी योगेशवर गुन्हे दाखल केले आहेत. तो पसार आहे. त्रिसदस्यीय समितीच्या चौकशीत याच झोनमध्ये २.३४ कोटींच्या देयकाचा घोटाळा उघड झाला आहे. यात खोट्या लाभार्थींच्या नावे काही बिले काढली गेली असतानाही अद्याप एफआयआर का नाही, असा नागरिकांचा सवाल आहे.बडनेरा झोनमध्ये ४०० हून अधिक लाभार्थींच्या नावाने ७५ लाखांच्या तीन बनावट नस्तीचा प्रकार आयुक्तांच्या निदर्शनास आल्यानंतर उपायुक्तांनी केलेल्या चौकशीतील लेखी जबाबात अधिकाऱ्यांनी आपली स्वाक्षरी नसल्याचे स्पष्ट करीत हात वर केले होते. या प्रकरणात लेखा विभागातील लिपिक अनुप सारवान व बडनेरा झोनचा कंत्राटी संदीप राईकवार यांच्याविरुद्ध तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. प्रकरण गुंतागुंतीचे असल्याने हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यांच्या तपासात दोन्ही आरोपींकडून बडनेरात एका एनजीओचा संचालक असलेल्या योगेश कावरेचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.योगेशचे नाव या प्रकरणात जोडले गेल्यापासून तो पसार आहे. पोलिसांनी त्याचे घर, कार्यालयाची झडती घेतली व कागदपत्रांची तपासणी केली. यामध्ये काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे त्यांच्या हाती लागल्याचे सांगण्यात आले. समाजात उजळमाथ्याने वावरत असलेल्या या मास्टरमाइंडची शहरातील अनेक पदाधिकारी व महापालिकेतील काही अधिकाऱ्यांशी जवळीक आहे. त्याच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे उघड होणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आता चांगलीच रंगली आहे.‘आरके’च्या अ‍ॅग्रीमेंटमधील देयकाचा लाभार्थीबडनेरा झोनमधील वैयक्तिक शौचालयाच्या २.३४ कोटींच्या कामाचा करारनामा आरके कन्स्ट्रक्शनशी झालेला असताना, देयके मात्र आरके ऐवजी अन्य कंत्राटदार व संस्थांना देण्यात आली. समितीच्या चौकशीत हा प्रकार उघड झाला. या प्रकरणाची व्याप्ती फार मोठी असल्याने याही प्रकरणात महापालिका प्रशासनाद्वारा एक-दोन दिवसांत पोलिसात तक्रार देण्यात येणार आहे. यामधील बोगस देयकाचा हा मास्टरमार्इंड लाभार्थी असल्याची बाब आता महापालिका वर्तुळात उघडपणे बोलले जात आहे.अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष का?प्रकरणातील नस्ती तयार केल्यानंतर त्यातील जावक क्रमांक, बिलांचे विवरण, लाभार्थींची नावे, पोर्टलवरील नोंद, झालेल्या कामाची खातरजमा तत्कालीन उपायुक्तांसह, सहायक आयुक्त, एमओएच, विभाग प्रमुख, उपअभियंता, अभियंता, एसआय, सिनिअर एसआय यापैकी एकानेही करू नये, हेच मोठे कोडे आहे. यातच खरे रहस्य दडले आहे. कामाचे कमिशन हा तर महापालिकेतील शिरस्ताच आहे. मात्र, बनावट नस्तीच समोर आलेली असताना, त्यावर काहींनी सह्या करणे व काहींनी बनावट स्वाक्षरी असल्याचे सांगणे प्रकरणाचा गुंता वाढवित आहे.महापालिकेतील अधिकाऱ्यांची बेपर्वाई, दिरंगाई व निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडला असल्याचे मी मानतो. अन्य प्रकरणांतही आता पोलिसांत तक्रार दिली जाईल व जबाबदार अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात येईल. कोरोनात यंत्रणा व्यस्त असल्याने विलंब होत आहे. दोषी असल्यास कुणाचाही मुलाहिजा नाही. - प्रशांत रोडे आयुक्त, महापालिका

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिस