शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीत २३ व्यक्तींचा मृत्यू

By admin | Updated: August 4, 2015 00:05 IST

पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडत नसला तरी, अमरावती विभागात १ जून ते २४ जुलै पर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे २३ व्यक्ती मृत्युमुखी पडले असून...

६६५ घरांची पडझड : १ जून ते २३ जुलैदरम्यान ६५ जनावरे ठारसुरेश सवळे चांदूरबाजारपाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडत नसला तरी, अमरावती विभागात १ जून ते २४ जुलै पर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे २३ व्यक्ती मृत्युमुखी पडले असून २८ मोठी, ३७ लहान तर १४ मध्यम स्वरुपाने जनावरेसुध्दा मृत्युमुखी पडल्याची माहिती शासकीय आकडेवारीनुसार प्राप्त झाली आहे. महाराष्ट्रातील काही भाग वगळता संपूर्ण विदर्भात पाण्याची टक्केवारी समाधानकारक नसतानाही नैसर्गिक आपत्तीमुळे अमरावती विभागात २३ व्यक्ती मृत्युमुखी पडले आहे. ज्यामध्ये अमरावती जिल्ह्यात ६, अकोला जिल्ह्यात ३, यवतमाळ ५, बुलडाणा ६, वाशिम ३ असा समावेश आहे. विशेष म्हणजे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यंमध्ये सर्वाधिक मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातच सर्वाधिक म्हणजे ६ इतकी असून एकूण मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीमध्ये वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सर्वाधिक १५ इतकी दिसून येते.विभागात २८ मोठी दुधाळ जनावरे मृत्युमुखी पडले आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक १९ इतकी आहे. तसेच लहान दुधाळ जनावरांची ३७ असून यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक २७ जनावरांचा समावेश आहे. अमरावती विभागात अवघड काम करणाऱ्या जनावरांची मृत्युंची संख्या १४ इतकी असून, बुलडाणा जिल्ह्यातीलच सर्वाधिक ६ जनावरे मृत्युमुखी पडल्याचे शासकीय आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे अमरावती विभागात मृत्युमुखी पडलेल्या एकूण २३ व्यक्तीपैकी काहींना एकूण ८४ लाख रुपये इतकी मदत शासनाकडून देण्यात आली आहे. पूर्णत: पडझड झालेल्या घरांची एकूण संख्या २ असून अंशत: पडझड झालेल्या कच्या घरांची संख्या मात्र ६६५ इतकी असल्यामुळे अमरावती विभागात पावसाच्या पाण्याचे प्रमाण कमी असतानासुध्दा नैसर्गिक आपत्ती मात्र सुरुच असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभे ठाकल्याचे दिसून येत आहे.