शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

२२ अधिका-यांच्या बेकायदा संपत्तीवर टाच! एसीबीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 17:32 IST

ज्ञात स्रोतापेक्षा जादा संपत्ती गोळा करणा-या राज्यातील २२ अधिकारी-कर्मचा-यांवर एसीबीने लगाम कसला आहे. महसूलसह अन्य १६ विभागांतील या २२ अधिकारी-कर्मचा-यांची ३५.५६ कोटींची बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

- प्रदीप भाकरे

अमरावती : ज्ञात स्रोतापेक्षा जादा संपत्ती गोळा करणा-या राज्यातील २२ अधिकारी-कर्मचा-यांवर एसीबीने लगाम कसला आहे. महसूलसह अन्य १६ विभागांतील या २२ अधिकारी-कर्मचा-यांची ३५.५६ कोटींची बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.१ जानेवारी ते १८ डिसेंबर २०१७ या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अपसंपदा बाळगल्याप्रकरणी २२ प्रकरणी गुन्हे दाखल केलेत. यात एकूण ४४ व्यक्तींचा सहभाग आहे. वर्ग १ चे ५, तर वर्ग २ व वर्ग ३ चे प्रत्येकी ८ तसेच एका अन्य लोकसेवकावर अपसंपदा बाळगल्याचा आरोप आहे. यात २२ खासगी व्यक्तींवरही गुन्हे दाखल झाले आहेत. या खासगी व्यक्तीत संबंधित अधिकारी-कर्मचा-यांच्या कौटुंबिक सदस्य आहेत.वर्ग १ च्या पाच अधिकाºयांनी १७ कोटींची अपसंपदा बाळगली, तर वर्ग २ व वर्ग ३ च्या अधिकारी-कर्मचाºयांवर अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ती मालमत्तासुद्धा एकूण १७ कोटींहून अधिक आहे. इतर लोकसेवकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यातील मालमत्ता ३२.३४ लाख आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यातील आठ परिक्षेत्रांमध्ये अपसंपदांची २२ प्रकरणे उजेडात आणली. यात महापालिकेचे पाच, महसूल व सार्वजनिक आरोग्य विभागातील प्रत्येकी तीन, प्रादेशिक परिवहन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रत्येकी दोन, तर पाटबंधारे, पंचायत समिती, उद्योग, ऊर्जा, कामगार विभाग, सहकार व पणन, कृषी, अन्न व औषधीसह वनविभागातील प्रत्येकी एका प्रकरणाचा समावेश आहे. 

अन्य भ्रष्टाचाराची २८ प्रकरणेलाच स्विकारताना यशस्वी केलेला सापळा, अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येतो. याशिवाय एसीबीने यंदा अन्य प्रकारच्या २८ घटनांमध्ये भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल केलेत. यात वर्ग १ चे ४९, वर्ग २ चे १५, वर्ग ३ चे २७, वर्ग ४ चे २, इतर लोकसेवक १२ व ८९ खासगी व्यक्तींसह १९४ व्यक्तींना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

टॅग्स :Amravatiअमरावती