सूरज दाहाटअमरावती : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी शहरातील जुन्या नगरपंचायतसमोर गाई, म्हशींचा पोळा भरविला गेला. यात गावातील हजारो नागरिक सहभागी होत असतात. यामध्ये एकमेकांच्या अंगावर फटाके फोडण्याची जीवघेणी परंपरा जोपासली जात आहे. अनेकांनी यात फटाके फोडण्याचा आनंद लुटला. त्यादरम्यान, किरकोळ वाद झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. या पोळ्यादरम्यान गाई म्हशींना क्लेष दिला जातो.जुन्या नगरपंचायतीसमोर मकाजी बुवाचे देवस्थान आहे. या देवस्थानाच्या प्रांगणात गावातील लोक आपले म्हशी, हेला, गाई आणतात. त्यांच्यात झुंजी लावतात. त्यादरम्यानच एकमेकांच्या अंगावर फटाके फोडले गेले. तिवसा पोलिसांनी यावेळी मोठा बंदोबस्त ठेवला. जनावरांना खेळवणे किंवा त्यांची स्पर्धा भरवणे, त्यांना निर्दयी वागणूक देणे, बेकायदेशिर आहे. मात्र कायद्याला तिलांजली देत जनावरांच्या पोळ्यात गाई म्हशींना नाहक त्रास दिला जातो.निवडणुकीनंतर ‘आमचं ठरलयं’‘आमचं ठरलं तिवस्यात फक्त कमळच फुलणार’ असे स्लोगन म्हशीच्या पाठीवर लिहिण्यात आले होते. विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यात तिवसा मतदार संघातून काँग्रेस विजयी झाली. त्यामुळे आता निवडणुकीनंतर तसे स्लोगन लिहिण्याचे औचित्य काय? असा सवाल तिवसावासियांमधून उपस्थित करण्यात आला.-------------------
२१ व्या शतकातही परंपरेच्या नावाखाली प्राण्यांना दिला जातोय क्लेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 12:33 IST
अमरावती शहरातील जुन्या नगरपंचायतसमोर गाई, म्हशींचा पोळा भरविला गेला. यात गावातील हजारो नागरिक सहभागी होत असतात. यामध्ये एकमेकांच्या अंगावर फटाके फोडण्याची जीवघेणी परंपरा जोपासली जात आहे.
२१ व्या शतकातही परंपरेच्या नावाखाली प्राण्यांना दिला जातोय क्लेश
ठळक मुद्देतिवसा येथील परंपरा निवडणुकीनंतर ‘फटाके’