शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

स्क्रब टायफसचे जिल्ह्यात २१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 22:23 IST

डेंग्यू या आजाराची धग जिल्ह्यात शमली नसतानाच आता स्क्रब टायफस या गवतातील कीटक चावल्याने होणाऱ्या आजाराने डोके वर काढले आहे. स्क्रब टायफसचे निदान करण्यासाठी जी रक्तचाचणी करण्यात येते, यामध्ये पॉझिटिव्ह व संशयित आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ५ सप्टेंबरपर्यंत १६ झाली असून, यापैकी पाच अतिगंभीर रुग्णांना यापुर्वीच नागपूर येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देवाढता प्रकोप, सतर्कता गरजेची : पाच नागपूरला 'रेफर'

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डेंग्यू या आजाराची धग जिल्ह्यात शमली नसतानाच आता स्क्रब टायफस या गवतातील कीटक चावल्याने होणाऱ्या आजाराने डोके वर काढले आहे. स्क्रब टायफसचे निदान करण्यासाठी जी रक्तचाचणी करण्यात येते, यामध्ये पॉझिटिव्ह व संशयित आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ५ सप्टेंबरपर्यंत १६ झाली असून, यापैकी पाच अतिगंभीर रुग्णांना यापुर्वीच नागपूर येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.जिल्ह्यात स्क्रब टायफसचा पहिला रुग्ण हा १९ आॅगस्टला आढळून आला होता. त्यानंतर चार संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी तीन जणांना नागपूरला उपचारासाठी पाठविण्यात आले होते. दोन रुग्णांवर अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या आठवड्यात पुन्हा जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील ग्रामीण भागात स्क्रब टायफसचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन रुग्णांवर येथील पीडीएमसीत उपचार सुरू आहेत, तर दोन रुग्ण पुन्हा नागपूरला हलविण्यात आले.पीडीएमसीत आतापर्यंत स्क्रब टायफस या आजाराचे सहा रुग्ण दाखल झाले आहे. यामध्ये स्क्रब टायफससाठी जी प्राथमिक चाचणी करण्यात येते, यामध्ये तीन रुग्णांची ती रक्तचाचणी पॉझिटिव्ह आढळून आली, तर तीन रुग्णांना त्याच प्रकारे लक्षणे असल्याने त्यांच्यावर स्क्रब टायफसचा उपचार करण्यात आल्याची माहिती पीडीएमसीचे डीन डॉ. पद्माकर सोमवंशी यांनी दिली. सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असल्याचे व काही रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.ग्रामीण भागात स्क्रब टायफसची मोठ्या प्रमाणात लागण होत आहे. बुधवारी येथील डॉ. पवन ककराणीया यांच्याकडे उपचारासाठी गेलेल्या दोन रुग्णांना स्क्रब टायफस हा आजार झाल्याचे आयजीएम फॉर स्क्रब टायफस या चाचणीत स्पष्ट झाले आहे. रुग्ण गरीब असल्याने इलायझा कन्फर्म ही चाचणी करण्यात आलेली नाही. पण, लक्षणे ही स्क्रब टायफसची असल्याने व कीटकाने चावा घेतल्याचे निशाण (इशर) आढळून आले. दोन्ही रुग्ण हे ६५ वर्षांवरील होते. यातील एक रुग्ण वरूड तालुक्यातील टेंभूरखेडा येथील असून, दुसरा रुग्ण हा मोर्शी तालुक्यातील घोडगव्हाण येथील असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोन्ही रुग्णांची प्रकृती चांगली असून, एका रुग्णाला दोन दिवसांत डिस्चार्ज देण्यात येणार आहे. आठवडाभरामध्ये डॉ. यादगिरे हॉस्पिटलमध्ये स्क्रब टायफसचे दोन रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. चांदूरबाजार तालुक्यातील करजगाव येथील ७२ वर्षाची वृद्धा या ठिकाणी दाखल झाली होती. तिची इलायझा कन्फर्म ही चाचणी केल्यानंतर स्क्रब टायफस पॉझिटिव्ह असे निदान झाले होते. २ सप्टेंबर रोेजी अमरावती येथील ६५ वर्षीय वृद्ध महिला उपचारासाठी दाखल झाली आहे. ती संशयितच असून, रॅपिड डायग्नोसिस करण्यात आल्याची माहिती डॉ. रोहिनी यादगिरे यांनी दिली. दोन्ही रुग्ण उपचार घेत असून, प्रकृती गंभीर आहे.स्थानिक डॉ. संदीप मलिये यांच्याकडे पूर्वी एक पीडीएमसीमधील रूग्ण आला होता. त्याला किडा चावल्याचे व स्क्रब टायफसची लक्षणे असल्याने उपचार करण्यात आला. हा रुग्ण चिंचोली मेटकर येथील होता. मंगळवारी चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी या गावातील ३५ वर्षीय तरुण उपचारासाठी दाखल झाला आहे. त्याची आयजीएम ही चाचणी पॉझिटिव्ह असल्याने व कीटक चावल्याचे निदर्शनास आल्याने त्याची रक्तचाचणी करून संशयित रुग्ण म्हणून उपचार सुरू केला आहे, अशी माहिती डॉ. संदीप मलीये यांनी दिले. पीडीएमसी व खासगी डॉक्टरांकडून घेतलेल्या माहितीनुसार, १६ रुग्ण स्क्रब टायफसबाधित आढळले आहेत.या भागात आढळून आले रुग्णकोठाडा (ता. नांदगाव खंडेश्वर) १, चांदूररेल्वे १, आमला विश्वेश्वर १, चिंचोली मेटकर (ता. अचलपूर) १, करजगाव (ता. चांदूरबाजार) १, वरूड १, बग्गी (ता. चांदूररेल्वे) १, अमरावती शहर १, मांगरूळी पेठ (ता. वरूड), टेंभुरखेडा (ता. वरूड) १, घोडगव्हाण (ता. मोर्शी) १. ग्रामीणमध्ये इतर भागातील रुग्ण आढळून आले.आमच्या हॉस्पिटलमध्ये दोन वृद्ध महिला उपचारासाठी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी एका रुग्णाची इलायझा ही चाचणी पॉझिटिव्ह आहे. दुसरा रूग्ण संशयित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.डॉ. रोहिनी यादगिरेअतिदक्षता तज्ज्ञस्क्रब टायफसचे आतापर्यंत सहा रुग्ण दाखल झालेत. तीन रुग्णांची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह आहे. इतरांमध्येही लक्षणे दिसल्याने त्या दृष्टीने उपचार केले. सर्व रुग्ण बरे झाले. लोकांनी घाबरू नये.- डॉ. पद्माकर सोमवंशीडीन, पीडीएमसी, अमरावती.दोन रुग्णांची प्राथमिक लक्षणे डेंग्यूसारखीच आहेत. डेंग्यू टेस्ट निगेटिव्ह आली. स्क्रब टायफससाठीची चाचणी पॉझिटिव्ह आली. स्क्रब टायफसच्या अनुषंगाने उपचार सुरू आहेत.- डॉ. पवन ककराणीया,अमरावती.