अमरावती : ऑडॅक्स इंडिया रॅन्डोनिअर्स क्लबद्वारा आयोजित बीआरएम सायकलिंग स्पर्धेत अमरावतीच्या सायकलिंग फॉर हेल्थ एंड फन व फ्रेंड्स फॉर एवर सायकलिंग ग्रुपमधील २१ सायकलपटूंनी भाग घेऊन २०० किमीचा फेरा १३ तासांत पूर्ण केला. त्यांना सायकलिंग क्षेत्रातील प्रतिष्ठित रॅन्डोनिअर्स रायडर किताब प्राप्त झाला आहे.
फ्रांसमधील ऑडॅक्स क्लबचा भारतातील सहयोगी क्लब ऑडॅक्स इंडिया रॅन्डोनिअर्सतर्फे सम्पूर्ण देशात सायकल राइड स्पर्धा घेण्यात येतात. बीआरएम स्पर्धेचे हे शतकीय वर्षे असल्याने कित्येक शहरांत हे आयोजन करण्यात आले होते. असेच आयोजन नागपूर येथे केले होते.
नागपूर येथील झिरो मैल ते मध्यप्रदेशातील पिपलपानी व वापस पिपलपानी ते झिरो मैल अशी २०० किमीची सायकल स्पर्धा १२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सायकलिंग फॉर हेल्थ एंड फन व फ्रेंड्स फॉर एवर या सायकलिंग ग्रुप च्या २१ सायकलपटूंनी हिरीरीने सहभाग घेतला व सर्वच्या सर्व स्पर्धकांनी ही २०० किमीची स्पर्धा ठरलेल्या १३ तासात पूर्ण केली.
बॉक्स
अमरावतीतून यांचा सहभाग
डॉ. अंजली देशमुख, सोनी मोटवानी, संजय पवार, अतुल कळमकर, सचिन पारेख, विजय धुर्वे, विनोद वानखडे, श्रीराम देशपांडे, ऋषिकेश इंगोले, अमोल बगाडे, सुधीर ठाकरे, नीलेश चांदूरकर, श्री मंगेश पाटील, आशिष नांदूरकर, विवेक इंगोले, आशिष कावरे, सुरेश खत्री, मनीष सिरवानी, अर्णव हिवराळे, चारुल पालकर, महेश मेश्राम, निशांत गुप्त यांचा समावेश होता.
दिनांक १५ सप्टेंबर रोजी कल्याणनगर येथील शिव मंदिरात आयोजित कार्यक्रमात बीआरएम स्पर्धेत सहभागी सायकलपटूंचा सत्कार अस्थिरोगतज्ज्ञ चंद्रशेखर कुळकर्णी, महसूल उपायुक्त संजय पवार, नामवंत रेडियोलाॅजिस्ट किरण ढवळे, प्रतिष्ठित व्यावसायिक अतुल कळमकर, पोलीस विभागाच्या नैसर्गिक आपत्ती निवारण विभागाचे अधिकारी विजय धुर्वे यांच्या हस्ते करण्यात आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अस्थिरोगतज्ञ चंद्रशेखर कुलकर्णी, प्रमुख पाहुणे डॉ. किरण ढवळे, संजय पवार होते. प्रास्ताविक, संचालन व आभार प्रदर्शन संजय मेंडसे यांनी केले. राष्ट्रगीतांने कार्यक्रमाची सांगता झाली.