५० बसेस ‘स्क्रॅप’ : प्रवाशांचा प्रवास होणार सुकर लोकमत विशेषसंदीप मानकर अमरावतीराज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रादेशिक कार्यालय अमरावती अंतर्गत चार डिव्हिजन येतात. यामध्ये नोव्हेंबर २०१४ ते आॅक्टोबर २०१५ पर्यंत एकूण २०७ नवीन बसेस दाखल झाल्या आहेत. निकामी झालेल्या ५० बसेस ‘स्क्रॅप’ (तोडणे) करण्यात आल्या आहेत. अमरावती प्रदेशांतर्गत पाचही जिल्ह्यांत एकूण १६०० बसेस धावतात. वर्षभरात ज्या जुन्या बसेसचे आयुष्य संपले आहे त्या एसटी बसेसना स्क्रॅप केले जाते. परंतु यावर्षी अमकावची प्रदेशांतर्गत अमरावती, बुलडाणा, यवतमाळ व अकोला या चार डिव्हिजनमध्ये २०७ नवीन बसेस रुजू झाल्यामुळे आता प्रवाशांची सोय होणार आहे.
वर्षभरात अमरावती प्रदेशाला मिळाल्या २०७ नवीन बसेस
By admin | Updated: November 4, 2015 00:11 IST