शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील केवळ २० तालुक्यांत पावसाचे शतक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 19:42 IST

यवतमाळ, वाशीम माघारले : अमरावती, अकोल्याने गाठली सरासरी

- प्रदीप भाकरेअमरावती : पावसाचा उणापुरा एक आठवडा शिल्लक असताना पश्चिम विदर्भातील केवळ २० तालुक्यांनी सरासरी गाठली आहे. उर्वरित तालुके ५० ते ९० टक्क्यांच्या आसपास आहेत. त्यातही यवतमाळ आणि वाशीम या दोन जिल्ह्यांत सरासरी ६० टक्के पाऊस झाला. आता आठवडाभरात ४० टक्के तूट भरून निघणारी नाही.

पावसाळ्याच्या १ जून ते २३ सप्टेंबर या कालावधीत अमरावती जिल्ह्यात १०५.५ टक्के, अकोला जिल्ह्यात ११५.१ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात नीचांकी ५९.८ टक्के, बुलडाणा जिल्ह्यात १००.४ टक्के व वाशीम जिल्ह्यात ७१.४ असा सरासरी ९०.४ टक्के पावसाची नोंद झाली. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाच्या ११३ दिवसांमध्ये अमरावतीत १००.३, अकोल्यात १०९.४, यवतमाळमध्ये ५६.९, बुलडाण्यात ९५.२ व वाशिम जिल्ह्यामध्ये ६७.९ टक्के असा सरासरी ८५.९ टक्के पाऊस पडला. पावसाळ्याचा एक आठवडा शिल्लक असताना ही विभागाची सरासरी तूट १४ टक्के असली तरी यवतमाळ जिल्ह्यात ती तूट सर्वाधिक ४३ टक्के अशी उच्चांकी आहे. सोबतच वाशिम जिल्ह्यातही ३२ टक्के पाऊस कमी पडल्याची यंदाची नोंद आहे.

पावसाच्या ११३ दिवसांची आकडेवारी बघितल्यास अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, चांदूरबाजार, दर्यापूर, धारणी व चिखलदरा या सात तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला. जिल्ह्यात चांदूरबाजार तालुक्यात सरासरीपेक्षा ४५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर व पातूर या पाच तालुक्यांनी पावसाचे शतक गाठले. बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी आठ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यात बुलडाणा, मलकापूर, नांदुरा, मोताळा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात आतापर्यंत ६६.४, माळेगावमध्ये ७३, रिसोडमध्ये ८३.५, मंगरुळपीरमध्ये ७४.९, मानोºयात ६०.५ व कारंजा तालुक्यात ७१.३ टक्के पावसाची नोंद झाली. 

यवतमाळ जिल्हा सरासरी ६० टक्केयवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी आर्णी तालुक्यात ७९.६ टक्के असा उच्चांकी पाऊस नोंदविला गेला. १६ पैकी एकाही तालुक्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत पुरेपूर पाऊस पडला नाही. पावसाचा केवळ आठवडा शिल्लक असताना यवतमाळ तालुक्यात केवळ ४२ टक्केच पाऊस पडला. कळंब, दारव्हा, केळापूर, घाटंजी, राळेगाव, झरी जामणी या तालुक्यांत पाऊस ५२ टक्क्यांवर स्थिरावला. १२० दिवसांच्या वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ४३ टक्के तूट नोंदविली गेली. गतवर्षीही यवतमाळ जिल्ह्यावरच पाऊस रुसला होता. सलग दुसºया वर्षी यवतमाळात पावसाची तूट नोंदविली गेली.