शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

२० तलाठी कार्यालयांची ‘बत्ती गूल’

By admin | Updated: April 28, 2017 00:12 IST

नागरिकांची गैरसोय होऊ नये, शेतकऱ्यांना गरज भासल्यास शासकीय कागदपत्रांची पूर्तता वेळेवर व्हावी,

 वर्षभरापासून वीजपुरवठा खंडित : वीज देयकांसाठी तरतूद केव्हा? नांदगाव खंडेश्वर : नागरिकांची गैरसोय होऊ नये, शेतकऱ्यांना गरज भासल्यास शासकीय कागदपत्रांची पूर्तता वेळेवर व्हावी, यासाठी शासनाने अनेक ठिकाणी स्वतंत्र तलाठी कार्यालये उभारली आहेत. परंतु या कार्यालयात वीज पुरवठ्यासाठी शासनाने कोणतीही तरतूद न केल्याने वीज बिल न भरल्याने वर्षभरापासून तालुक्यातील २० तलाठी कार्यालयांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने खंडित केला आहे. अनेक ठिकाणचे मीटरसुद्धा काढण्यात आल्याने प्रचंड उन्हाच्या कडाक्यात तलाठ्यांची प्रचंड दमछाक होत आहे. शासनाने कोट्यवधी रूपये खर्चून तालुक्यात नांदगाव खंडेश्वर, धानोरा गुरव, पापळ, वाढोणा रामनाथ, पिंप्री गावंडा, पिंप्री निपाणी, सावनेर, तळेगाव, मंगरूळ चव्हाळा, शिवणी, शिरपूर, सालोड, लोहगाव इत्यादी ठिकाणी तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारती तयार करण्यात आल्यात. यापैकी अनेक कार्यालयात वर्षभरापूर्वी मीटर बसविण्यात आलेत. पण, वर्षभरात वीज देयकाची रक्कम न भरल्याने महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित करून मीटर काढून नेले. काही ठिकाणी सहा महिन्यांपासून वीज देयक न भरल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. याबाबत तहसील कार्यालयाकडे विचारणा केली असता तलाठी कार्यालयाच्या वीज देयकांसाठी तरतूदच नसल्याची माहिती आहे. त्यामुळे बांधकामासाठी पैसा आहे. परंतु वीज देयके भरण्यासाठी नाही, अशी अवस्था तहसील कार्यालयांची झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)