शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

कांडली ग्रामपंचायतीला २ लाख ३० हजारांचा दंड

By admin | Updated: February 12, 2015 00:22 IST

शहरालगत असलेल्या २२ हजार लोकसंख्येच्या कांडली ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप ग्रामस्थ अनेक दिवसांपासून करीत आहेत.

परतवाडा : शहरालगत असलेल्या २२ हजार लोकसंख्येच्या कांडली ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप ग्रामस्थ अनेक दिवसांपासून करीत आहेत. त्यातील कित्येक नागरिकांनी त्यासाठी आजवर ग्रामपंचायत तसेच वरिष्ठांना हजारो तक्रारी पाठविल्या असेल. त्याचा परिपाठ म्हणून या ग्रामपंचायतीला २०१०-११ मध्ये गावात बांधकाम केलेल्या खडीकरण नालीमध्ये तस्करीचे गौणखनीज वापरल्याचे निष्पन्न झाल्याने अखेर येथील तालुका दंडाधिकाऱ्यांनी या ग्रामपंचायतीला २ लाख ३० हजारांचा दंड ठोठावला आहे. बांधकाम केलेल्या कालावधीत तालुक्यातील बाळूघाटांवरील वाळू उपस्याला बंदी असल्याने सदर कारवाई केली आहे. अचलपूर तालुक्यातील विविध रेतीघाटांचा हर्रास न झाल्याने वाळूवर बंदी होती. मात्र तरीही २०१०-११ मध्ये कांडली ग्रामपंचायतीने गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी चोरट्या मार्गाने गौणखनीज वापरले होते. याबाबतची तक्रारी येथील सामाजिक कार्यकर्ते जी.एम. गावंडे यांनी येथील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे दोषी आढळून आले. त्यामुळे वरील दंड ठोठावण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे सदर कामाची निविदा ग्रामपंचायतीने बंद पडलेल्या येथील एका वर्तमानपत्रात १६ मे १९१० मध्ये प्रकाशित केली होती. ही निविदा ग्रामस्थ व २०१० च्या विशेष सभेसमोर ठेवून त्याचे वाचन करण्यात आले. तेव्हा सदस्यांमधील मतभेदामुळे एकही निविदा आली नसल्याचे सांगत तसा खोटा ठराव करुन त्यानंतर एका दैनिकात पुन्हा निविदा प्रसिद्ध करुन ११ जून २०१० रोजी सदर निविदा उघडण्यात आल्या. यामुळे बांधकामाची निविदा प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. या नियमबाह्य प्रक्रियेबाबत अचलपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडेही लेखी तक्रारी झाल्याने त्यांनी चौकशी करुन गटविकास अधिकाऱ्यांवर १२ हजार २१४ रुपयांची वसुली काढली होती. कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न झाल्याचा आरोप गावंडे व व्ही.के. कोथळकर यांनी केला होता. वाळू व बदरी या गौणखनिजाची वाहतूक झालेल्या वाहनांचे क्रमांक हे दुचाकीचे असल्याचे निष्पन्न झाल्याचे यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीला त्यावेळी मोठा आधार मिळाला होता. कांडली ग्रामपंचायतीने शासनाची दिशाभूल करणे येथेच थांबविले नाही. वाहतूक परवाने जिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या शिक्क्यासह प्रमाणित केले. त्याचा उपयोग करुन शासनाची दिशाभूल झाल्याचे पुरावे तपास यंत्रणेला प्राप्त झाले. त्यामुळे सरपंच व ग्रामविकास अधिकारी व सदस्यांकडून दंडाचे २ लाख ३० हजार ४०० रुपये व्याजासह वसूल केले जावे, अशी मागणी त्यांनी केली होती. गौणखनीजाचा उपयोग केल्यामुळे २५ मार्च २०११ रोजी ५२ हजार ८०० रुपयांचा दंड ग्रामपंचायत कांडलीला ठोठावला होता. त्यावर समाधान न झाल्याने येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे त्यांनी अपील दाखल केले होते. त्यावरुन त्यांनी २८८ ब्रास वाळू व बदरी नियमबाह्य वापरल्याचा ठपका ठेवला होता. त्यावरुन ६ २०११ रोजी एक आदेश पारित करुन ग्रामपंचायतीला २ लाख ३० हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावला. या आदेशाच्या विरोधात ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. मात्र त्यांनी ५ जून २०१३ ला एक आदेश पारित करुन स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत ग्रामपंचायत कांडलीला दंड भरण्याचे आदेश दिले.