शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

८४३ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी अवघे १० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:38 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे मागील काही महिन्यांपासून शाळांच्या जीर्ण इमारत आणि वर्गखोल्यांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. शिक्षण विभागाकडे प्राधान्याने शाळा दुरुस्तीसाठी ५९५ प्रस्ताव आहेत, तर नवीन वर्गखोल्यांकरिता २४८ शाळांचे प्रस्ताव जिल्हा परिषद आमसभेत मंजूर करण्यात आले.

ठळक मुद्देप्रशासनाची अडचण : ३२६ वर्गखोल्यांचाच होणार कायापालट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे मागील काही महिन्यांपासून शाळांच्या जीर्ण इमारत आणि वर्गखोल्यांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. शिक्षण विभागाकडे प्राधान्याने शाळा दुरुस्तीसाठी ५९५ प्रस्ताव आहेत, तर नवीन वर्गखोल्यांकरिता २४८ शाळांचे प्रस्ताव जिल्हा परिषद आमसभेत मंजूर करण्यात आले. मात्र, या सर्व कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून केवळ १० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. यामधून केवळ ३२६ वर्गखोल्यांची दुरुस्ती व नवीन कामे केली जाणार आहेत. उर्वरित कामे निधीअभावी किती वेळ प्रलंबित ठेवावीत, असा पेच प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.सद्यस्थितीत जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाला शाळा वर्गखोल्यांच्या नवीन व दुरुस्तीच्या कामांसाठी दोन्ही मिळून १० कोटींचा निधी दिला आहे. सदर निधीच्या तुलनेत शिक्षण विभागाकडे प्राधान्याने दुरुस्तीची कामे करण्याचे ५९५ प्रस्ताव असले तरी यामधून २६३ कामे होऊ शकतात, तर २४८ शाळांमधील ३४४ नवीन वर्गखोली बांधकामासाठी प्रत्येकी ९ लाख ५० हजार रुपये खर्चाप्रमाणे यात ६३ वर्गखोल्यांचे नवीन बांधकामे होऊ शकतात. त्यामुळे दोन्ही मिळून जवळपास ८४३ शाळा वर्गखोल्यांच्या कामांपैकी ३२६ शाळांमध्येच कामे होऊ शकता. त्यामुळे उपलब्ध असलेला निधीही हा तोकडा पडत असून, सर्व ठिकाणी कामे करण्यासाठी साधारणपणे ४० कोटींपेक्षा जास्त निधीची गरज शिक्षण विभागाला आहे. जिल्हा नियोजन समिती व शासनाने शाळांमधील नवीन व दुरुस्तीच्या कामांसाठी भरीव निधी द्यावा, याकरिता सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र, पुरेसा निधी मिळत नसल्याचे अडचणी अधिकच वाढत आहेत. परिणामी उपलब्ध निधीतून एवढी मोठे कामे मार्गी लावण्याचे आव्हान पदाधिकारी व प्रशासनासमोर आहे.जिल्हा निधीतून हवी तरतूदजिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे जीर्ण वर्गखोल्यांची कामे तसेच नवीन बांधकामासाठी प्रस्तावांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्हा निधीतूनही दुरुस्तीची कामे करण्यासाठी काही निधी उपलब्ध करून द्यावा, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्याशिवाय हा वर्गखोल्यांचा तिढा सुटू शकणार नाही. 

टॅग्स :Schoolशाळा