शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिसचे 194 रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 05:00 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात अमरावती स्थित नेहरूनगरातील एका ६० वर्षीय रुग्ण ११ जून रोजी दाखल झाला. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा उजवा डोळा खराब असल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात ११ जूनलाच रेफर करण्यात आले. त्याच्यावर नागपूर येथे उपचार करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देतिघांचे डोळे काढावे लागले, एकाचे सोळा दात काढले

इंदल चव्हाणलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे १९४ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७६ रुग्ण औषधोपचाराने बरे सुखरूप घरी गेले, तर ६५ रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रिया व महागडे औषधोपचार मोफत करण्यात आले. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळू शकल्याने १२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाने घेतली आहे. सद्यस्थितीत १११ रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात ३३, सुपर स्पेशालिटीत तीन, पीडीएमसीत ३०, खासगी रुग्णालयात १२ रुग्णांचा समावेश आहे. तीन रुग्णांना डोळ्यात खूपच जास्त इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांचे डोळे काढावे लागले, तर एका रुग्णाच्या दातात काळी बुरशीचा मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन झाल्याने  वरील दात काढावे लागले. 

म्युकरमायकोसिसचे लक्षणे

डोळ्यांच्या पापणीला सूज, दात, दाढ दुखणे, डोकेदुखी, विसर पडणे ही म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे आहेत. पोस्ट कोविड झालेल्या रुग्णांना यापैकी कुठलीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे तपासणी करण्याचे आवाहन डॉक्टर नम्रता सोनोने यांनी केले.

उपचार सुरू असतानाच निदानजिल्हा सामान्य रुग्णालयात अमरावती स्थित नेहरूनगरातील एका ६० वर्षीय रुग्ण ११ जून रोजी दाखल झाला. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा उजवा डोळा खराब असल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात ११ जूनलाच रेफर करण्यात आले. त्याच्यावर नागपूर येथे उपचार करण्यात येत आहेत.

३३ वर्षीय युवकाचे सोळा दात काढलेनांदगाव पेठ येथील ३३ वर्षीय रुग्णाला दातात खूपच जास्त प्रमाणात इन्फेक्शन झाल्याने त्रास असह्य झाले होते. त्यामुळे वरील १६ दातांचा अख्खा संचच काढावे लागले.

जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे १९३ रुग्ण आढळले. ६५ रुग्णांची महात्मा ज्योतिराव फुल जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या शासकीय व खासगी मिळून ७८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. - डाॅ. सचिन सानप, जिल्हा समन्वयक, महात्मा फुले जनआरोग्य योजना

ही घ्या काळजी

पोस्ट कोविड झाल्यानंतर म्युकरमाकोसिसची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा. हा आजार संसर्गातून होत नसला तरी त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या