शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

लसीकरणानंतर १९ जणांना कोरोनाचा संसर्ग; अमरावती आरोग्य यंत्रणेची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 13:43 IST

Amravati News कोरोनाची लस घेतली, आता संसर्ग होणार नाही, अश्या अविर्भावात वावरणाऱ्यांना कोरोनाने चांगलाच झटका दिला आहे. अशा १९ हेल्थ केअर वर्करना या आठवड्यात कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देएक महिन्यानंतर वाढते रोगप्रतिकारशक्ती

गजानन मोहोड

 लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कोरोनाची लस घेतली, आता संसर्ग होणार नाही, अश्या अविर्भावात वावरणाऱ्यांना कोरोनाने चांगलाच झटका दिला आहे. अशा १९ हेल्थ केअर वर्करना या आठवड्यात कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्य यंत्रणाद्वारे याला दुजोरा देण्यात आला.

कोरोना संसर्गात अग्रभागी असलेल्या आरोग्य यंत्रणेतील सर्वांनाच सर्वप्रथम कोरोनाची लस देण्यात येत आहे. जिल्ह्यात ही प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू झाली व आतापर्यंत १०,८७४ ‘हेल्थ केअर वर्कर’ना लस देण्यात आलेली आहे. १६,४६२ कर्मचाऱ्यांची पहिल्या टप्प्यातील लसीकरणाची प्रक्रिया जिल्ह्यातील २१ केंद्रावर सध्या सुरू आहे. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बूथवर कोव्हॅक्सिन व उर्वरित २० बूथवर कोविशिल्ड ही लस दिली जात आहे.

याच सर्वांना पुन्हा महिनाभरानंतर लसीचा दुसरा डोज देण्यात येईल. शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी एक ते दीड महिन्यांचा अवधी लागतो व तोवर धोका कायम असतो. कोव्हॅक्सिनमध्ये डेड व्हायरस असल्यामुळे यापासून संसर्ग होत नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.

लसीकरणाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये मात्र मोठी उत्सुकता आहे. त्याचसोबत अनेक प्रश्नही आहेत. मानवी चाचण्यांमधून या लसीची परिणामकारकता सिद्ध झाल्यानंतरच तिचा वापर सुरू झालेला आहे. मात्र, लस घेतली म्हणजे, कोरोना विरुद्ध कवचकुंडले प्राप्त झाली, असा याचा अर्थ नाही. प्रतिबंधित उपाययोजना व त्रिसूत्रीचा अवलंब करणे अनिवार्य असल्याचे सीएस निकम यांनी सांगितले.

अ‍ॅन्टिबॉडीज किती दिवस टिकणार?

कोरोना संसर्गापासून बचावासाठी लस घेतल्याने शरीरात प्रतिपिंडे (अ‍ॅन्टिबॉडी) तयार होतात. परंतु, त्या सहा महिने टिकणार की वर्षभर, याविषयी एकवाक्यता मात्र नाही. लसीची परिणामकारकता ७५ टक्के असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. गर्भवती, स्तनदा मातांना मात्र लस दिल्या जात नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

यांना झाला लसीकरणानंतर कोरोना संसर्ग

लसीकरण झाल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांमध्ये एक माजी आमदार, महापालिकेतील डॉक्टर, लॅब टेक्निशियन, जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचारी, सुपर स्पेशालिटीमधील आरोग्य कर्मचारी, नर्सिंग होस्टेलमधील नर्स व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

२१४ आरोग्य कर्मचाऱ्यांना रिअ‍ॅॅक्शन

कोरोनाची लस घेतल्यानंततर २१४ जणांना हलक्या स्वरूपाची रिअ‍ॅक्शन झाल्याच्या तक्रारी आहेत. काहींना उपचारार्थ दाखल करावे लागले होते. मात्र, आतापर्यंत झालेल्या १० हजारांवर लसीकरणाच्या तुलनेत रिअ‍ॅक्शनचे प्रमाण खूप कमी आहे. हातपाय दुखणे, ताप, घशात खवखव, छातीत धडधड, चक्कर येणे आदी लक्षणे दिसून आलेली आहेत.

या केंद्रावर लसीकरण

शहरात पीडीएमसी, आयुर्वेदिक कॉलेज, तखतमल कॉलेज, डेंटल कॉलेज, वसंत हॉल व जिल्हा सामान्य रुग्णालय, अच्युत महाराज हॉस्पिटल व जिल्हा ग्रामीणमध्ये अचलपूर, मोर्शी, धारणी व दर्यापूर उपजिल्हा रुग्णालय, तिवसा, चांदूर रेल्वे, धामणगाव, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदूर बाजार व अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय तसेच वरूड व अंजनगाव बारी केंद्रावर लसीकरण सुरु आहे.

लसीकरणानंतरही काळजी महत्त्वाची

लसीकरणानंततरही शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार व्हायला एक ते दीड महिन्यांचा अवधी लागत असल्याने तोवर धोका कायम असतो. त्यामुळे चेहऱ्याला मास्क, हात वारंवार धुणे, फिजिकल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा वापर करणे अनिवार्य आहे.

लस घेतली म्हणूून रिलॅक्स होऊ नये. रोगप्रतिकारशक्ती तयार व्हायला वेळ लागत असल्याने धोका कायम असतो. निष्काळजीपणामुळेच काही जणांना लसीकरणानंतर संसर्ग झालेला आहे.

- डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस