शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीला ‘एनडीआरएफ’चे १८३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 21:07 IST

गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे एकूण पेरणी क्षेत्रापैकी ८९.४८ टक्के क्षेत्रातील कपाशीचे ३३ टक्क््यांवर नुकसान झाल्याचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल सोमवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला.

ठळक मुद्देबोंडअळीचे नुकसान : ८९.४८ टक्के क्षेत्रात प्रादुर्भाव, शासनाला अहवाल

आॅनलाईन लोकमतअमरावती : गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे एकूण पेरणी क्षेत्रापैकी ८९.४८ टक्के क्षेत्रातील कपाशीचे ३३ टक्क््यांवर नुकसान झाल्याचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल सोमवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला. त्याअनुषंगाने जिरायती व बागायती क्षेत्रातील बाधित कपाशीच्या मदतीसाठी केंद्राच्या ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे १८२ कोटी २६ लाखांच्या मदतीची मागणी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी शासनाकडे केली आहे.यंदाच्या हंगामात २ लाख २१ हजार ४१५ शेतकºयांनी २ लाख २२ हजार ५८६ हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी केली. मात्र, आॅक्टोबर महिन्यात आलेल्या गुलाबी बोंड अळीच्या संकटाने ८९.४८ टक्के म्हणजेच १ लाख ९९ हजार १७२ हेक्टर क्षेत्रात कपाशीचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. यामध्ये जिरायती कपाशीचे १ लाख ३० हजार ८२९ हेक्टर, तर बागायती कपाशीचे ६८ हजार ३४३ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यामध्ये जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी ६८०० रुपये याप्रमाणे ८९ कोटी ६१ लाख ११ हजार, तर बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये याप्रमाणे ९२ कोटी ९८ लाख ९२ हजारांची मदत आवश्यक आहे. हे नुकसान केंद्राच्या नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी पात्र आहे.बियाणे कंपन्यांकडून भरपाई व ‘एनडीआरएफ’ची मदत मिळावी, यासाठी गुलाबी बोंड अळीने बाधित क्षेत्र पंचनाम्याचे आदेश ७ डिसेंबरला जिल्ह्यधिकाºयांनी सर्व तालुका यंत्रणांना देऊन अहवाल मागविला. ५ डिसेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कपाशीच्या बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करून केंद्राच्या एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्या अनुषंगाने कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व तुडतुड्यांमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाचे उपसचिव सु.ह. उमरीकर यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाºयांना दिलेत. याच पत्राच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सर्व तहसीलदार, बीडीओ व तालुका कृषी अधिकारी यांना बाधित कपाशीचे पंचनामे करून संयुक्त अहवाल मागविला होता. हा अहवाल सोमवारी विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला व त्यानंतर शासनाला सादर होणार आहे. बोंड अळीबाधित क्षेत्राचे अहवाल सादर झाल्यानंतर राज्य शासन केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव सादर करणार आहे. त्यानंतरच अटी-शर्तींच्या निकषामध्ये केंद्राची मदत प्राप्त होणार आहे.जिल्ह्यात १.९१ लाख हेक्टर बाधितबोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार १७२ हेक्टरचे नुकसान झाले आहे. दर्यापूर तालुक्यात २६,५०३ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ६,१७१, अमरावती ५,९८०, चांदूर बाजार १४,४०८, भातकुली ७,२३५, अंजनगाव सुर्जी १४,८८७, धारणी ९,६६१, चिखलदरा १,२२७, चांदूर रेल्वे ९,१६५, धामणगाव रेल्वे ३२,३०४, मोर्शी १९,३३९, वरूड २३,६०८, तिवसा १२,०९० व अचलपूर तालुक्यात २३,६०८ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा अहवाल आहे.तालुकानिहाय आवश्यक भरपाईजिल्ह्यात बोंड अळीमुळे १८२ कोटी २६ लाख रूपयांची मदत आवश्यक आहे. यामध्ये भातकुली तालुक्यात ५.५० कोटी, अमरावती ७.५५ कोटी, चांदूर रेल्वे ६.१८ कोटी, धामणगाव रेल्वे २१.९४ कोटी, नांदगाव खंडेश्वर ७.८६ कोटी, मोर्शी १९.२२ कोटी, वरूड २७.९४ कोटी, चांदूर बाजार १५.३४ कोटी, तिवसा १२.६३ कोटी, अचलपूर १८.७१ कोटी, अंजनगाव सुर्जी १४.९१ कोटी, दर्यापूर १६.९७ कोटी, धारणी ६.७७ कोटी व चिखलदरा तालुक्यात १ कोटी रुपयांची मदत आवश्यक आहे.