शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

गुरुकुंज उपसा सिंचन योजनेतून १८ हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 05:01 IST

जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी पूर्वीपासून निरंतर प्रयत्न सुरू आहे. माजी आमदार स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांनी १९८४ मध्ये शेतकरी बांधवांना सिंचनासाठी पाणी मिळावे म्हणून या उपसा सिंचन प्रकल्पाची मागणी केली. परिसरातील शेतीत पाणी पोहोचून शेतकरी बांधवांना बारमाही सिंचनाची सुविधा निर्माण व्हावी, असे त्यांचे स्वप्न होते. त्याची पूर्ती या योजनेच्या साकारण्यातून होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गुरुकुंज उपसा सिंचन योजनेमुळे १८ हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार असून, कृषी उत्पादकता वाढेल व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावतील, असे प्रतिपादन पालकमंत्री  यशोमती ठाकूर यांनी शनिवारी मोझरी येथे केले.गुरुकुंज उपसा सिंचन योजनेच्या कामाची पाहणी पालकमंत्र्यांनी  केली. त्यानिमित्त मोझरी येथील दासटेकडी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता रश्मी देशमुख, तहसीलदार वैभव फरतारे, माजी जलसंपदा अधीक्षक अभियंता रमेश ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी पूर्वीपासून निरंतर प्रयत्न सुरू आहे. माजी आमदार स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांनी १९८४ मध्ये शेतकरी बांधवांना सिंचनासाठी पाणी मिळावे म्हणून या उपसा सिंचन प्रकल्पाची मागणी केली. परिसरातील शेतीत पाणी पोहोचून शेतकरी बांधवांना बारमाही सिंचनाची सुविधा निर्माण व्हावी, असे त्यांचे स्वप्न होते. त्याची पूर्ती या योजनेच्या साकारण्यातून होत आहे. योजना पूर्णत्वासासाठी सातत्याने पाठपुरावा करत तांत्रिक अडचणींवर मात करण्यात आली. उर्ध्व वर्धा सिंचन प्रकल्प योजनेंतर्गत गुरुकुंज उपसा सिंचन योजना साकारण्यात येत आहे. यामुळे गुरुदेवनगर, मोझरी, शेंदोळा (खु.), विचोरा, मालेगाव, फत्तेपूर, शिवणगाव, कोळवण, शेंदूरजना (बु.), शेंदूरजना (खु.), अनकवाडी, रघुनाथपूर, रंभापूर, पाळवाडी, कवाडगव्हाण, अदमपूर, धोटे, वऱ्हा, भांबोरा, वाठोडा, मालधूर, शिरजगाव आदी २२ गावांना सात हजार १०९ हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे. विंचोरी येथे उपकालव्याद्वारे शेतापर्यंत पाणी पोहोचले आहे. इतर कामही पूर्ण होईल. पूरक व्यवसायांनाही चालना देणार, असे ना.यशोमती ठाकूर म्हणाल्या. शेतीसोबत पूरक व्यवसायही वाढीस लागावेत, असा त्यांचा प्रयत्न आहे. जेणेकरून सिंचनाने कृषी उत्पादकता वाढण्याबरोबरच उत्पन्नाचे पर्यायी मार्गही उभे राहतील. या प्रकल्पासाठी उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या उजव्या मुख्य कालव्यातून पाणी उचल होणार आहे.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प