शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

१८ घरकुले, २ सिंचन विहिरी अन् ६४ शौचालये बोगस; कारवाई होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 18:12 IST

Amravati : तळेगाव दशासर ग्रा.पं.चा प्रताप; सीईओंद्वारा गठित चौकशी समितीचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धामणगाव रेल्वे दशासर तालुक्यातील तळेगाव ग्रामपंचायतीत सन २०२० ते २०२४ या दरम्यान १८ घरकुले, २ सिंचन विहिरी आणि ६४ शौचालये बोगस आढळून आली आहेत. मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या निर्देशानुसार गठित चौकशी समितीचा हा अहवाल असून २० लाखांपेक्षा जास्त शासन निधीचा अपहार झाला आहे. असे असताना जिल्हा प्रशासनाने अद्यापपर्यंत यातील दोषींवर कोणतीही कारवाई न केल्यामुळे संशय बळावला आहे.

तळेगाव दशासर येथे २९ मे २०२५ रोजी विशेष ग्रामसभा बोलावून स्वच्छ भारत मिशन व सिंचन विहीर यासह १४ व १५ वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या विकासकामात घोटाळ्याबाबत चौकशी अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. तसा ठराव ग्रामसभेने पारितदेखील केला होता. परंतु, ग्रामपंचायतीने याविषयी कोणतीही कार्यवाही केली नाही. परिणामी या विषयाला वाचा फोडण्यासाठी १० जून २०२५ रोजी तळेगाव दशासर ग्रामपंचायतीसमोर अशोकराव धनजोळे, संजय सारवे, रमेशराव ठवकर, अमर सुरजुसे, अतिश कावळे, पुंडलिकराव बाबरे, शंकरराव शेलोकार, शंकरराव शिरभते बेमुदत उपोषण केले होते.

सलग चार दिवसांच्या उपोषणनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संजीता महापात्र यांचे पत्र आणि आमदार प्रताप अडसड यांच्या आश्वासानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी वरूड येथील चार अधिकाऱ्यांची १२ जून २०२५ रोजी समिती गठित करण्यात आली होती.

सीइओंना २५ जुलै रोजी चौकशी अहवाल सादरलेखी जबाब, रेकॉर्डची पडताळणी करून चौकशी समितीने सीईओंना २५ जुलै २०२५ रोजी प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला. या समितीने ग्रामपंचायतीत प्रत्यक्ष भेट दिली होती.

एकाच कुटुंबात पती-पत्नीसह तिघांना घरकुलचौकशी समितीने सादर केलेल्या अहवालानुसार सिंचन विहिरीचा लाभसधन व्यक्तीला देण्यात आला आहे. तर पती-पत्नीसह त्याच कुटुंबात तिघांना घरकुलाचा लाभ घेतला आहे. त्यामुळे शासन निधीचा गैरवापर करण्यात तळेगाव दशासर ग्राम पंचायतने कळस गाठल्याचा उल्लेख आहे. मनरेगा अंतर्गत विहिरींचा लाभ श्रीमंताना देण्यात आला आहे. या चौकशी समितीने १७ जून ते १७ जुलै २०२५ या दरम्यान ग्रामपंचायत दशासर येथे प्रत्यक्ष भेट देत तक्रारकर्त्यांचे बयाण नोंदविले होते.

"तळेगाव दशासर येथे ग्रामपंचायतीने शासन निधीत अपहार केल्याप्रकरणी चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून यात पडताळणी अंती जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल."- संजीता महापात्र, सीईओ, अमरावती. 

टॅग्स :Amravatiअमरावती