शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती बाजार समितीच्या १८ संचालकांना मागितला खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 22:10 IST

बाजार समितीमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी आमदार रवि राणा यांनी पणन मंत्र्यांकडे तक्रार केली होती. याच प्रकरणात एक रीट याचिकादेखील न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

ठळक मुद्देजिल्हा उपनिबंधकांची नोटीस : कृषी पणन मंडळाला अभिप्रायासाठी आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बाजार समितीमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी आमदार रवि राणा यांनी पणन मंत्र्यांकडे तक्रार केली होती. याच प्रकरणात एक रीट याचिकादेखील न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या अधिन राहून राज्य पणन मंडळाला अभिप्राय पाठविण्यासाठी अमरावती बाजार समितीच्या १८ संचालकांना जिल्हा उपनिबंधकांनी नोटीस बजावून खुलासा व स्वयंस्पष्ट अहवाल मागितला आहे.महाराष्ट्र कृषिउत्पन्न खरेदी विक्री (विकास व नियमन) अधिनियम १९६३ चे कलम ४५ (अ) अंतर्गत येथील जिल्हा उपनिबंधकांनी अमरावती बाजार समितीच्या १८ संचालकांना २४ एप्रिल २०१८ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीसंदर्भात बाजार समितीचे संचालक अशोक दहिकर व इतर नऊ संचालकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रीट याचिका दाखल केली असल्याने कार्यवाही करण्यापूर्वी राज्य पणन मंडळाशी आगाऊ विचारविनिमय करणे आवश्यक आहे. परंतु, रीट याचिकेवर अद्यापपर्यंत निर्णय झालेला नसल्याने कार्यवाही करता येत नसल्याचे मत राज्य पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकांनी १ आॅगस्टच्या पत्रान्वये स्पष्ट केले आहे. त्याअनुषंगाने कार्यकारी संचालकांनी ३० आॅगस्ट २०१८ च्या पत्रान्वये या रीट याचिकेच्या अधिन राहून अमरावती बाजार समितीच्या १८ संचालकांचे खुलासे व इतर दस्तऐवज जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे स्वंयस्पष्ट अहवालासह मागविले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधकांनी या संचालकांना कलम ४५ (अ) अंतर्गत नोटीस बजावून खुलासे मागितले असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.