ग्राहक वेठीस : नवीन वीज वाहिनीच्या नावाखाली कुचंबणाश्यामकांत पाण्डेय धारणीमहावितरण कंपनी मेळघाटातील जनतेशी खेळी चालविली आहे. १७० गावांतील लोकांना अंधारात ठेवण्याचा डाव रचल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे. हिवरखेड येथून १३२ के. व्ही. हिवरखेड उपकेंद्रातून निघणाऱ्या ३३ के. व्ही. धारणी वाहिनीवर दुरुस्ती व सुधारणेचे काम प्रस्तावित आहे. या कामासाठी ७ आॅगस्ट २०१६ पासून धारणी, गोंडवाडी, कढाव व डाबका उपकेंद्र व त्या अंतर्गत येणाऱ्या गावांचा वीजपुरवठा आठवड्यातील रविवार, मंगळवार, गुरुवार व शनिवार रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता महावितरण अचलपूर यांनी कळविले आहे. दिलेल्या वेळापत्रकाचे पालन न करता महावितरणद्वारे मनमानीपणे रात्रंदिवस वीजपुरवठा बंद ठेवला जात आहे. याबाबत विचारणा केल्यावर ‘ब्रेकडाऊन’ या नावाचा वापर करून ग्राहकांची सतत दिशाभूल केली जात आहे. याविषयी अधिक माहिती घेतली असता या ३३ के. व्ही. वाहिनीचे काम घेणाऱ्या कंत्राटदाराची कामाची मुदत संपल्याने त्याचेवर रोज एक ठराविक रक्कम दंड म्हणून आकारले जात असल्याचे कळते. त्यामुळे अधिक विलंब टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चिरीमिरी करून रात्रंदिवस वीजपुरवठा बंद ठेवून काम करण्याचा घाट कंत्राटदाराकडून रचला जात आहे.याबाबत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळत नाही. मोठ्या मुश्किलीने झाला. मात्र उडवाउडवीची उत्तरे ग्राहकांना दिली जात आहेत. त्यामुळे कंत्राटदार व महावितरणाचे अधिकारी दरम्यान काहीतरी साटेलोटे सुरू असल्याच्या शंकेला बळ प्राप्त होते. महावितरण कंपनीविरोधात रोष रविवारी सकाळी ५ वाजतापासून वीजपुरवठा बंद करण्यात आले होते. वृत्त लिहेपर्यंत म्हणजेच दुपारी तीनपर्यंत वीज पुरवठा बंदच आहे. त्यामुळे धारणी व चिखलदरा तालुक्यातील १७० गावे काल रात्रभर अंधारात होता. त्यामुळे पाणी पुरवठा, दळण, संगणक व इतर महत्वाची कामे ठप्प पडली आहे. वेळेचा भान न ठेवता अतिरिक्त वीज पुरवठा बंद करण्यात येत असल्याने जनतेत महावितरण विरुद्ध रोषाचे वातावरण आहे.
३६ तासांपासून १७० गावे अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2016 00:06 IST