शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
4
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
5
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
6
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
7
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
8
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
9
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
10
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
11
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
12
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
13
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
14
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
15
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
16
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
17
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
18
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
19
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
20
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर

१७ पर्यंत मतदार यादीवर नोंदवा आक्षेप

By admin | Updated: January 4, 2017 00:20 IST

जिल्हापरिषद, पंचायत समिती व महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५ जानेवारी २०१७ या दिनांकावर प्रसिद्ध केलेली विधानसभा निवडणुकांची यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : जिल्हाधिकाऱ्यांची पत्रपरिषद अमरावती : जिल्हापरिषद, पंचायत समिती व महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५ जानेवारी २०१७ या दिनांकावर प्रसिद्ध केलेली विधानसभा निवडणुकांची यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. या यादीवर १२ ते १७ जानेवारीदरम्यान हरकती नोंदविल्या जाणार आहेत. यादी बिनचूक व्हावी व यामधील मुद्रण दोष निकाली निघालेत यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केले. जिल्ह्यात महापालिका वगळता १३ लाख ८१९ मतदार आहेत. दरम्यान नागरिकांनी या यादीचे अवलोकन करून आक्षेप नोंदविल्यास यादी अचूक होणार आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमिवर राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी व्ही.सी.द्वारे पूर्वतयारीचा आढावा घेतला. यामध्ये सर्वात महत्त्वाची सूचना ही अचूक मतदारयादीसंदर्भात आहे. यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदार यादीमध्ये काहींची नावे गहाळ झाल्याने नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले होते. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत याद्या बिनचूक व्हाव्यात, यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पत्रपरिषदेला महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, निवडणूक उपजिल्हाधिकारी सिद्धभट्टी उपस्थित होते. २२ प्रभागांत विभागवार यादी महापालिकेत सध्या ५ लाख ५२ हजार मतदार आहेत. यामध्ये आणखी २० ते २२ हजार मतदार नव्याने जुळणार आहे. शहरात चार सदस्यीय प्रभाग प्रणालीनुसार संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ती संभाव्य उमेदवार व राजकीय पक्षांनी डाऊनलोड करावी. १२ ते १७ जानेवारीदरम्यान आक्षेप नोंदवावे, असे आवाहन आयुक्त हेमंत पवार यांनी केले. ‘त्या’ शिक्षकांवर होणार फौजदारी अमरावती तालुक्यात २५७ बोगस मतदारप्रकरणी चौकशी केली असता चार शिक्षकांनी जन्मतारखेचे बोगस दाखले दिल्याचे निष्पन्न झाले. याबाबत जिल्हा मतदार नोंदणी अधिकारी या नात्याने आपण स्वत: त्या शिक्षकांवर फौजदारी दाखल करू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.