शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर -औरंगाबाद महामार्गावर १७ टन गॅसचा टँकर उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 14:50 IST

मुंबईहून खापरीकडे १७ टन गॅस घेऊन जाणारा टँकर पलटी होऊन गॅस गळती सुरू झाली. स्फोट होण्याच्या भीतीने या मार्गावरील वाहने दूरवरच थांबल्याने तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांची रांग लागली होती. ही घटना बुधवारी पहाटे ६.३० दरम्यान घडली.

ठळक मुद्देदेवगावजवळील घटनातीन किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग

मोहन राऊतअमरावती : मुंबईहून खापरीकडे १७ टन गॅस घेऊन जाणारा टँकर पलटी होऊन गॅस गळती सुरू झाली. स्फोट होण्याच्या भीतीने या मार्गावरील वाहने दूरवरच थांबल्याने तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांची रांग लागली होती. ही घटना बुधवारी पहाटे ६.३० दरम्यान घडली.मुंबईहून नागपूरकडे हिंदुस्थान पेट्रोलियम गॅस घेऊन जात असलेला टँकर क्रमांक एन.एल.ए.ए. ०४२६ अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील देवगावपासून एक किलोमीटर अांतर भारती पेट्रोल पंपाजवळ संतुलन बिघडल्याने पलटी झाला. दरम्यान मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. नागपूरकडून येणारी वाहतूक धामणगाव रेल्वेमार्गे वळविण्यात आली, तर मुंबईवरून येणारी जडवाहने चांदूर रेल्वेमार्गे वळविण्यात आली.अनर्थ टळलागॅस भरलेला टँकर पलटी झाला त्या भागात पेट्रोल पंप व ढाबे आहेत. नजीकच्या भवनात अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात ३० शिबिरार्थी सहभागी झाले. या घटनेमुळे शिबिराथिंर्ना तळेगाव दशासर येथे हलविण्यात आले. गॅसमधून गळती सुरू झाल्याने दोन किलोमीटरचा परिसर सकाळी खाली करण्यात आला. पाच किलोमीटरपर्यंत या गॅसची दुगंर्धी येत होती. धामणगाव येथील हिंदुस्थान पेट्रोलियम गॅसचे अशोक भन्साली, निखिल भन्साली, खापरी येथील क्षेत्रीय प्रबंधक महेश राम, भरारी अधिकारी, विनोद साळुंके, तहसीलदार अभिजित नाईक, नायब तहसीलदार कृष्णा सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पलटी झालेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये गॅस टाकण्याचे कार्य बातमी लिहिस्तोवर सुरू होते. तळेगाव दशासर व वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे.खड्ड्यांमुळे झाला अपघातसर्वाधिक खडे असलेल्या या सुपर एक्स्प्रेस हायवेवर दररोज एक दोन अपघात होतातच. जो गॅस टँकर पलटी झाला त्या परिसरात मोठमोठे खड्डे आहेत. एका वषार्पासून या रस्त्यावरील खडे दुरुस्त करण्यात आले नाहीत.गॅस रिफिलिंग पॉइंट होणार कधी?मध्य रेल्वे मागार्ने पूर्वी गॅसची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत होती. मात्र, आता मुंबई - नागपूर या सुपर एक्स्प्रेस हाय-वेवरून दररोज गॅस घेऊन जाणारे १० ते १५ टँकर जातात. मात्र खबरदारी घेणारी कंपनीची कोणतीच यंत्रणा कार्यरत नाही. दोनशे किलोमीटर अंतरावर गॅस रिफिलिंग सेंटर असणे गरजेचे आहे. गॅस टँकर पलटी झाल्या त्वरित मदत करणारी यंत्रणा गॅस कंपनीने कार्यरत करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात