शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१७ टँकरने ३० गावात पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:47 IST

चिखलदरा शहरासह तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या योजना मृतप्राय झाल्याने नागरिकांना १७ टँकर व विहिरी, बोअरवेल अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. ५० पेक्षा अधिक आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे५० पेक्षाअधिक गावे तहानलेली : विहिरीत सोडले जातेय टँकरने पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : चिखलदरा शहरासह तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या योजना मृतप्राय झाल्याने नागरिकांना १७ टँकर व विहिरी, बोअरवेल अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. ५० पेक्षा अधिक आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अपुऱ्या टँकरमुळे पाण्यासाठी वणवण भटकंती व पाण्यासाठी होणारे वाद पाहता टँकरचे पाणी थेट विहिरीत सोडले जात आहे.चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये मार्च महिन्यापासूनच टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मान्सूनचे उशिरा आगमन पाहता संपूर्ण जून महिन्यापर्यंत ५० पेक्षा अधिक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासणार आहे.तालुक्यातील आडनदी, भिलखेडा, कोयलारी, पाचडोंगरी, सोनापूर, धरमडोह, बहाद्दरपूर, पिपादरी, खिरपाणी, सोमवारखेडा, मलकापूर, कोरडा, तारूबांदा, लवादा, एकझिरा, बिहाली, कोहाना, भांद्री, खडीमल, गौलखेडा बाजार, कुलंगना, मोथा, पस्तलाई, नागझिरा, वस्तापूर, मोरगड, आलाडोह, शहापूर, अंबापाटी, खटकाली, झिंगापूर आदी गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कोरडा, गंगारखेडा, हतरू, ढाणा, जैतादेही, वस्तापूर, जमलीआर, झिंगापूर, अंबापाटी, शहापूर आदी गावांमध्ये विहीर आणि बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. खटकाली खोंगडा, रामटेक, बगदरी आदी गावे टँकरच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींचा समावेश असून १६० पेक्षा अधिक गावे आहेत. त्यातील ५० पेक्षा अधिक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.पाणी अडवा, पैसे जिरवाकोट्यवधी रुपये खर्च करून मेळघाटात मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. परंतु पाण्याची पातळी खालावल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ असा मंत्र देत मेळघाटात ठिकठिकाणी नदी नाल्यांवर बंधारे आणि उंच-सखल भागावर सीसीटीची कामे करण्यात आलीत. प्रत्यक्षात ही सर्व कामे नामशेष झाल्याचे चित्र आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाणी न अडवता त्यातील पैसा स्वत:च्या खिशात जिरविल्याचा आरोप आहे.हातपंप कोरडे, विहिरी आटल्यातालुक्यात एकूण ३३७ हातपंप असून पाण्याची पातळी खोल गेल्याने ते हातपंप कोरडे पडले आहेत. ५० हातपंप नादुरुस्त असून त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे पंचायत समितीकडून सांगण्यात आले. मात्र पाण्याची पातळी खोल गेल्याने त्या हातपंपातून पाण्याचा उपसा होत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई