शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत कर्तव्यावरील १७ पोलीस मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:29 IST

सन २०१७-१८ या दोन वर्षांच्या कालावधीत अमरावती ग्रामीण विभागातील एकूण १७ पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देअमरावती ग्रामीण विभागाचे कर्मचारी : अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून आर्थिक मदत

चेतन घोगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : सन २०१७-१८ या दोन वर्षांच्या कालावधीत अमरावती ग्रामीण विभागातील एकूण १७ पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडल्याचे दिसून येत आहे.अमरावती कल्याण शाखेच्या माहितीनुसार, दोन वर्षांत १७ पोलीस कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. सन २०१७ मध्ये दोन मोटार वाहन अपघातात, एक आत्महत्या, तर चार अल्पशा आजाराने असे सात पोलीस कर्मचाºयांचा मृत्यू झाला. सन २०१८ मधील आतापर्यंतच्या सात महिन्यांच्या कालावधीत १० पोलीस कर्मचारी मृत्युमुखी पडले. त्यामध्ये अल्पशा आजाराने तीन, मोटर वाहन चालवताना दोन, हृदयविकाराने एक, पाण्यात बुडून एक, तर दोघांनी आत्महत्या केल्या व एकाचा कर्तव्यावर मारहाणीत मृत्यू झाला. या सर्व पोलीस कर्मचाºयांना पोलीस कल्याण निधीमधून, ज्या दिवशी मृत्युमुखी पडले, त्याच दिवशी त्यांच्या परिजनांना १२ हजारांची तत्काळ मदत देण्यात आली. इतर लाभाशिवाय प्रत्येक कुटुंबातील एक जण अनुकंपा तत्त्वावर पोलीस विभागात नोकरीवर लावून घेतला जाईल, असे शासन परिपत्रकात नमूद आहे.ओरिएंटलकडून १० लाखांची निधीअपघातात निधन झालेल्या ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचे पगारी खाते अ‍ॅक्सिस बँकेत आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना अशा प्रसंगासाठी ३० लाखांचा लाभ मिळतो, तसेच ओरिएन्टल इंश्यूरन्सकडून १० लाखांपर्यंत मदत मिळते. संदीप राठोड यांच्या कुटुंबीयांना १० लाखांचा लाभ मिळाला, तर पवन जाधव या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना स्टेट बँकेकडून एक लाखांचीच मदत मिळाली आहे.अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून नऊ लाखांची मदतचांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले संतोष मडावी यांचा कर्तव्यावर असताना झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यांना अमरावती ग्रामीण पोलीस अधिकारी-कर्मचाºयांकडून नऊ लाखाची मदत त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली.महाराष्ट्र शासनाकडे कर्तव्य बजावत असताना पोलीस शिपाई संतोष मडावी हे मारहाणीत ठार झाले. त्यांना शहिदाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.- एम.एन. मकानदार,पोलीस उपअधीक्षक,अमरावती ग्रामीण