शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

सात्त्विक इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकाकडून १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

By admin | Updated: May 27, 2015 00:15 IST

गुंतवणुकीच्या माध्यमातून ११ लाखांनी फसवणूक करणाऱ्या सात्विक इन्व्हेस्टमेंट कंपनी संचालकाकडून १६ लाख १५ ....

अमरावती : गुंतवणुकीच्या माध्यमातून ११ लाखांनी फसवणूक करणाऱ्या सात्विक इन्व्हेस्टमेंट कंपनी संचालकाकडून १६ लाख १५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केला. कॉटन ग्रिन कॉलनीतील रहिवासी रमेश मधुकर कोलते (५८) व पांडुरंग मारोती नारखडे यांनी सात्विक इन्व्हेस्टमेंट कंपनीत ११ लाखांची गुंतवणूक केली होती. मात्र, त्यांचे पैसे परत देण्यात आले नव्हते. याबाबत त्यांनी १२ मे रोजी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी संचालक आरोपी अमोल जगन्नाथ ढाके (४०, रा. भरतनगर, नागपूर), एजन्ट कृष्णा व एका इसमाविरूध्द भादंविच्या कलम ४२०, ४०६, ४०९, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यावर पोलिसांनी अमोल ढाके याला नागपूर येथील कारागृहातून प्रोड्यूस वाँरटवर ताब्यात घेतले. त्यांची पोलीस कोठडीत चौकशी करण्यात आली. आरोपी अमोल ढाकेने नागरिकांच्या पैशांतून इर्न्व्हटर खरेदी करून विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. त्याने नागपूर येथील भाऊ रामचंद्र ढाके यांच्या कारखान्यात इन्व्हर्टर ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण पारधी, राजू शेंडे, विनोद धुळे, एएसआय कदीर, राजेश अंबुलकर, मनोज उसरडे, ईश्वर चक्रे व महिला पोलीस अस्मिता यांचे पथक नागपूरला रवाना झाले होते. पोलिसांनी कारखान्यात ठेवलेले १६ लाख ८५ हजार २५० रुपयांचे २४० इन्व्हर्टर जप्त केले आहे. हा माल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविण्यात प्रस्ताव आला आहे.