शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

१७ तास फायरफायटिंग

By admin | Updated: May 26, 2015 00:25 IST

औषधी कंपनीच्या तळमजल्यातील १० हजार लिटर रसायनापर्यंत आग पोहोचली असती तर रसायनांच्या स्फोटामुळे ....

६० लाख लिटर पाण्याचा मारा१० हजार लिटर केमिकल बचावलेअमरावती : औषधी कंपनीच्या तळमजल्यातील १० हजार लिटर रसायनापर्यंत आग पोहोचली असती तर रसायनांच्या स्फोटामुळे संपूर्ण एमआयडीसी परिसर आगीच्या विळख्यात सापडले असते. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता रात्रभरात ६० लाख लिटर पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. एमआयडीसी परिसरातील लॅक्साकेम आर्गनाईज कंपनीचे संचालक परेश राजा आहेत. कंपनीत दररोज औषधी तयार करण्याचे काम चालते. त्याकरिता २५ ते ३० मजूर कार्यरत आहेत. रविवारी रात्री कंपनीत शॉर्ट सर्किटमुळे अचानक भीषण आग लागल्याने मजुरांसह सर्वांनीच धावपळ सुरु केली होती. रात्री ९.२० वाजता अग्निशमन विभागाला आगीची माहिती मिळताच तत्काळ पाण्याचे बंब घेऊन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र, कंपनीतील रसायनाच्या साठ्यामुळे आगीने भीषण रुप धारण केले होते. कंपनीतील रसायनांचा स्फोट होत असतानाही अग्निशमन विभागाने आग विझविण्याचे कार्य सुरुच ठेवले होते. आगीच्या लपटा तब्बल १५ ते ३० फूट उंचीपर्यंत हवेत पसरत होत्या. त्यातच रसायनाच्या भरलेल्या कॅनमुळे वांरवार स्फोटसुध्दा होत होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आग विझविताना मोठे परिश्रम घ्यावे लागले. एका मजुराचे हात भाजलेकंपनीला भीषण आग लागल्याचे पाहून एका मजुराने तळमजल्याकडे जाणाऱ्या पाईप लाईनचा व्हॉल बंद केला. मात्र, व्हॉल आगीमुळे गरम झाल्याने मजुराचा हात भाजला. मजुराने जीवाची पर्वा न करता व्हॉल बंद केल्याने तळमजल्यापर्यंत आग पोहोचली नाही. हे विशेष. भीषण आगीत स्फोट होत असतानाही कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवून आगीवर नियंत्रण मिळविले. कंपनीच्या तळमजल्यापर्यंत आग पोहोचली असती तर १० हजार लिटरच्या रसायनाचा स्फोट होण्याचीसुध्दा शक्यता होती. हा स्फोट झाला असता तर संपूर्ण एमआयडीसी पसिरराला मोठा धोका निर्माण झाला असता.- भरतसिंग चव्हाण, अधीक्षक.