शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

वरुडमध्ये १७ शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: December 13, 2014 22:31 IST

तीन वर्षांपासून वरुड तालुक्यात अतिवृष्टी, गारपीट तसेच कोरडा दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. शेतकऱ्यांपुढे समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे.

संजय खासबागे - वरूडतीन वर्षांपासून वरुड तालुक्यात अतिवृष्टी, गारपीट तसेच कोरडा दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. शेतकऱ्यांपुढे समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे. नैराश्यामुळे मागील ७ महिन्यांत तालुक्यातील १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे आकडेवारीरवून स्पष्ट झाले आहे.सन २०१०पासून सतत सुरू असलेल्या निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकऱ्यांची अवस्था विदारक झाली व शेती व्यवसाय मोडकळीस आला आहे. अतिवृष्टी, गारपीट आणि नंतर कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून दुबार, तिबार पेरणी करुनही निसर्गाच्या अवकृपेमुळे शेती व्यवसाय पूर्णत: डबघाईस आला आहे. बदलत्या वातावरणामनुळे उत्पादनात कमालीची घट झाली. तरीही शेतकऱ्यांनी पर्याय व्यवसाय नसल्यामुळे शेती व्यवसाय सुरुच ठेवला. परंतु उत्पादनाला हमीभाव मिळत नसल्याने लागवडीचा खर्चही निघणे दुरापास्त झाले आहे. १४ एप्रिल ते ६ आॅक्टोबर २०१४ पर्यंत तब्बल १७ शेतकऱ्यांनी या कारणांमुळे आपली जीवनयात्रा संपविली. दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये तालुक्यात अतिवृष्टी, गारपिटीने पिके बुडाली. संत्रा गळाला. मृग नक्षत्रामध्ये मृगाच्या पावसाने तब्बल दोन महिने दडी मारल्याने खरीप पिके बुडाली. यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची झाली. केवळ शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुला-मुलींची लग्न, मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बँकांच्या कृषी कर्जाचा भरणा कसा करावा, सावकारांचे कर्ज कसे फेडायचे, हा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.