शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

मेळघाटातील १६४१ बालके तीव्र कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 22:19 IST

कुपोषणमुक्तीकरिता राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असला तरी मेळघाटातील बालके या दुष्टचक्रातून बाहेर आलेली नाहीत. धारणी तालुक्यात सप्टेंबर महिन्यात १६४१, तर आॅक्टोबर महिन्यात १५०२ बालके कुपोषणाच्या अतितीव्र छायेत आढळून आली आहेत.

ठळक मुद्देदुष्टचक्र : कुषोषणमुक्तीकरिता अंगणवाडी सेविकांकडून अपेक्षा

पंकज लायदे।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : कुपोषणमुक्तीकरिता राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असला तरी मेळघाटातील बालके या दुष्टचक्रातून बाहेर आलेली नाहीत. धारणी तालुक्यात सप्टेंबर महिन्यात १६४१, तर आॅक्टोबर महिन्यात १५०२ बालके कुपोषणाच्या अतितीव्र छायेत आढळून आली आहेत.धारणी तालुक्यातील बालविकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत दहा परिक्षेत्रांमध्ये २५१ अंगणवाडी केंद्रे आहेत. या अंगणवाडी केंद्रांमध्ये १६४१ बालके कुपोषणाच्या अतितीव्र छायेत असून, राज्य शासनाकडून कुपोषणमुक्तीकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी व्यर्थ जात आहे. कुपोषणाचा मेळघाटला लागलेला कलंक मिटण्याच्या विचारातून शासनाचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था काम करीत नसून, फक्त अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून कुपोषणमुक्ती करण्याचा प्रयत्न सुरूआहे.परिक्षेत्रनिहाय कुपोषणदुनी ८३, चाकर्दा १२०, कलमखार १५९, साद्राबाडी २६४, टिटम्बा २२२, बिजुधावडी २२२, धूळघाट रेल्वे १५५, बैरागड १३९, चटवाबोड १३२, हरिसाल १४५ अशी दहा परिक्षेत्रांतर्गत एकूण १६४१ बालके कुपोषणाच्या अतितीव्र छायेत आहेत.अमृत आहाराची तपासणी गरजेचीशासनाची राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना मेलघाटातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये सुरू आहे. या योजनेतील आहार गर्भवती माता अंगणवाडी केंद्रातून घरी आणतात. घरी त्याचे सेवन गर्भवतींकडून होते की कुटुंबीयांकडून, याची माहितीच नसते. यासंदर्भात तपासणी गरजेची ठरली आहे.कुपोषणमुक्तीच्या शासनाच्या योजना कुचकामी ठरल्या असून, ज्या योजना सुरू आहेत, त्यावर अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नियंत्रण नाही. आरोग्य विभाग, बालविकास प्रकल्प विभागातील रिक्त जागाही कुपोषणाला कारणीभूत आहेत.- डॉ. रवि पटेल,सामाजिक कार्यकर्ता, धारणीप्रत्येक अंगणवाडी केंद्रांतर्गत व्हीसीडीसी सुरू करून मातेसह बाळाला सकस आहार पुरवून सुदृढ करण्याचे उद्दिष्ट आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरू आहे. कुपोषण नक्की कमी होईल, अशी अपेक्षा आहे.- प्रशांत थोरात,उपमुख्य कार्यकारी अधिकारी