लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आषाढी यात्रेसाठी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकानासह जिल्ह्याच्या सहा आगारांतून पंढरपूरकरिता यंदा ५३३ बसेस सोडल्या जाणार आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातून १५० परिवर्तन, आठ दोन आसनी व दोन शयनयान शिवशाही बस अशा १६० बस ५ ते १६ जुलै दरम्यान सोडल्या जाणार आहेत. भाविकांसाठी अमरावती, बडनेरा, परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार या आगारांतूनही पंढरपूरसाठी बस सुटतील.आषाढी वारीसाठी परिवहन महामंडळाने सर्व तयारी केली आहे. १६० बस गाड्यांचे नियोजन केले आहे. वारकऱ्यांनी मागणी केल्यास बसस्थानकावरून विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. मागील काही दिवसांपासून आषाढी एकादशीनिमित्त संतांच्या पालख्यांचा प्रवास पंढरपूरच्या दिशेने सुरू झाला असून, बसने जाणाºया वारकºयांनाही विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागली आहे. राज्य परिवहन महामंडळावर दरवर्षी आषाढीवारीनिमित्त वारकºयांची ने-आण करण्याची मोठी जबाबदारी असते. त्यामुळे जुलै महिना हा गर्दीचा हंगाम गृहीत धरला जातो. यंदा १२ जुलै रोजी एकादशी असून, महामंडळाने ५ ते १६ जुलै दरम्यान राज्यभरातून वारकºयांची पंढरपूरला ने-आण करण्यासाठी एसटी बस सज्ज ठेवल्या आहेत.पुरेसे प्रवासी असल्यास गावातूनही एसटीआषाढीनिमित्त पंढरपूर वारीला जाणारे पुरेसे प्रवासी मिळाल्यास अशा गावातून मागणीनुसार एसटी महामंडळाकडून बस आरक्षण करता येईल. गावातूनच एसटी बस थेट पंढरपूरक रिता सोडण्याची व्यवस्था महामंडळाने केली आहे, शिवाय पंढरपूर येथून परतीचा प्रवास करणाºया भाविकांसाठी आरक्षणाची सुविधा महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. दोन आसनी तसेच शयनयान शिवशाही बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात अनुक्रमे ४५ व ३० टक्के सवलतही दिली जाणार आहे. सोबत यंदा पंढरपूर वारीसाठी धावणाºया संबंधित चालक आणि वाहकांची नावे, मोबाइल क्रमांक प्रवाशांच्या माहितीसाठी ठळकपणे प्रदर्शित केला जाईल.महामंडळाने आषाढी निमित्त जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.प्रवाशांचा प्रवास सुलभ व्हावा याकरीता विविध उपाययोजना केल्या आहेत.- श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक, एस.टी महामंडळ
आषाढीसाठी धावणार १६० बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 23:31 IST
आषाढी यात्रेसाठी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकानासह जिल्ह्याच्या सहा आगारांतून पंढरपूरकरिता यंदा ५३३ बसेस सोडल्या जाणार आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातून १५० परिवर्तन, आठ दोन आसनी व दोन शयनयान शिवशाही बस अशा १६० बस ५ ते १६ जुलै दरम्यान सोडल्या जाणार आहेत. भाविकांसाठी अमरावती, बडनेरा, परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार या आगारांतूनही पंढरपूरसाठी बस सुटतील.
आषाढीसाठी धावणार १६० बस
ठळक मुद्देएसटी महामंडळ : ५ ते १६ जुलै दरम्यान फेऱ्या