शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

१६ शाळा होणार मॉडेल स्कूल म्हणूृन विकसित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:20 IST

अमरावती : राज्याच्या शिक्षण विभागाने प्रत्येक तालुक्यातील एक याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या ३०० शाळा या आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) म्हणून ...

अमरावती : राज्याच्या शिक्षण विभागाने प्रत्येक तालुक्यातील एक याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या ३०० शाळा या आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) म्हणून विकसित होणार आहे. यामध्ये येथील जिल्हा परिषदेच्या १४ आणि महापालिका क्षेत्रातील दोन अशा १६ शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये उत्तम भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन या तीन निकषांवर या शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी दिली.

बॉक्स

अशा असेल आदर्श शाळा

पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालक व शाळांमध्ये पाठविण्यात इच्छुक असतील.

विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षणातून ज्ञानाची निर्मिती येईल.

रचनात्मक व आनंददायी शिक्षणातून विद्यार्थ्यांना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त शिक्षण अवगत करता येईल.

विद्यार्थ्यांची शारीरिक ,बौध्दिक व मानसिक विकास होणे हे मुख्य उद्दिष्ट असेल.

विविध क्षेत्रातील कौशल्य विकसित करणारी ही शाळा असेल.

बॉक्स

अशा प्रकारे निवडल्या शाळा

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने आर्दश शाळा निवडीकरिता जास्त पटसंख्या असलेली आणि शाळेत भौतिक सुविधा निर्माण करण्यास वाव असलेली शाळा आदर्श शाळेसाठी निवडण्याच्या सूचना १४ गटशिक्षणाधिकारी यांना दिल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातून एका शाळेची निवड करून तसा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर झेडपीच्या १४ व महापालिकेच्या एक अशा जिल्ह्यातून १६ शाळांची मॉडेल स्कूलकरिता निवड झाली आहे.

बॉक्स

या आदेश निवड झालेल्या शाळा

तालुका शाळेचे नाव पटसंख्या

अचलपूर जि. प. शाळा हरम १९५

अमरावती जि. प. शाळा नांदुरा बुद्रुक १०१

महापालिका अल्लामा इकबाल मनपा उर्दू शाळा नं.२ ७७६

महापालिका शासकीय विद्यानिकेतन ९८

अंजनगाव सुर्जी जि. प. उच्च प्राथमिक शाळा पांढरी २८०

भातकुली जि.प. उच्च उर्दू प्राथमिक शाळा टाकरखेडा १०२

चांदूर बाजार जि. प. उच्च प्राथमिक उर्दू शाळा तळेगाव मोहना १३७

चांदुर रेल्वे जि. प. उच्च प्राथमिक शाळा जळका जगताप १३८

चिखलदरा जि. प. उच्च प्राथमिक शाळा गांगरखेडा १०२

दर्यापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा येवदा १७६

धामणगाव रेल्वे जि. प. प्राथमिक शाळा अंजनसिंगी १३५

धारणी जि. प. प्राथमिक शाळा खिडकीकलम १४२

मोशी जि.प.उच्च प्राथमिक मुलींची शाळा नेरपिंगळाई ३६५

नांदगाव खंडेश्वर जि. प. उच्च प्राथमिक शाळा शिवणी रसुलापूर २२५

तिवसा जि. प. उच्च प्राथमिक शाळा मार्डी १२७

वरुड जि. प. प्राथमिक शाळा बेनोडा २३१