कठोरा रोडवरील घटना : जखमी चालकास नागपूरला हलविलेअमरावती : कारच्या धडकेत मालवाहू वाहनातील तब्बल १६ मजुर जखमी झाल्याची घटना सायंकाळी कठोरा रोडवरील रंगोली लॉनजवळ घडली. या अपघातात चारचाकीचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला नागपूर हलविण्यात आले आहे. पोलीस सुत्रानुसार रमोती दौलत उईके (४०) सुनिता कवरलाल धुर्वे (३०), सुमन सखाराम त्रिकार (४५), अनिता श्रीराम धुर्वे (३५), नरेंद्र दौलत मुरले (३५), रत्ना कालीदास भुसुम (२७), दौलत भुरा उईके (४५), उमेश जामुनकर (१५), सोनकली धुर्वे(१८), सौगती कास्देकर (४०), संगिता धुर्वे (१७), सर्देश धुर्वे (३), समोती धुर्वे (४५), सोनाजी पटले(१७), सरस्वती ऊईके (१५), भानुदास झांगरु (२५,सर्व राहणार धारणी) अशी जखमींची नावे आहे. या अपघातातील देशमुख नामक चालक हा गंभीर जखमी झाला आहे. मालवाहू वाहन क्रमांक एमएच २७-बी-९६७२ रंगोली लॉनकडून कठोरा मार्गाकडे जात होते. दरम्यान लोकवस्तीतून बाहेर निघणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक एमएच २७ बीसी-५५५० ने मालवाहू वाहनाला जबर धडक दिली. या अपघातात मालवाहू वाहनातील १६ मजुर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पुंडकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय धाडसे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि रुग्णालयातील जखमीचे बयाण नोंदविले.
कारच्या धडकेत १६ मजूर जखमी
By admin | Updated: January 8, 2017 00:16 IST