शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे रेल्वेचा 16 तासांचा मेगा ब्लॉक, अनेक रेल्वे गाड्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 19:06 IST

भुसावळ रेल्वे स्थानकावर १९ एप्रिलला रुळांच्या कामासाठी १६ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे भुसावळ-नागपूर दरम्यान धावणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.

अमरावती : भुसावळरेल्वे स्थानकावर १९ एप्रिलला रुळांच्या कामासाठी १६ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे भुसावळ-नागपूर दरम्यान धावणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. या मार्गावर २१ एप्रिलपासून रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरळीत होईल, असे कळविण्यात आले आहे. 

मध्य रेल्वे विभागाने भुसावळ रेल्वे स्थानकावरील महत्त्वाची कामे आटोपण्यासाठी ५ ते २० एप्रिल दरम्यान पॅसेंजर रेल्वेसह काही एक्स्प्रेस, मेल रद्द करण्याचा निर्णय अंमलात आणला. भुसावळ रेल्वे स्थानकावरील यार्डचे नूतनीकरण, नवीन प्लॅटफार्म आणि तिसरा लोहमार्ग निर्मितीचे कार्य युद्धस्तरावर होत असल्याने दरदिवशी आठ तासांचा मेगा ब्लॉक घेतला जात होता. मेगा ब्लॉकमुळे ७८ रेल्वे गाड्यांच्या फेºया रद्द झाल्या. या अनुषंगाने शुक्रवारी भुसावळ येथे १६ तासांचा मेगा ब्लॉक घेऊन सर्वच कामे संपुष्टात आणली गेली. त्यामुळे २१ एप्रिलपासून रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू होतील, असे संकेत मिळाले आहेत.  

भुसावळ-नागपूर मार्गावर या रेल्वे गाड्या होत्या रद्द अमरावती-सुरत एक्स्प्रेस , अमरावती-पुणे (वातानुकूलित) एक्स्प्रेस, भुसावळ-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस, हावडा-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस, पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस, हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस, गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस या गाड्या रद्द होत्या. भुसावळ रेल्वे स्थानकाहून जाणाऱ्या हॉलिडे स्पेशल सहा फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. भुसावळ-नागपूर, अमरावती-भुसावळ, नरखेड-भुसावळ, वर्धा-भुसावळ, मुंबई-भुसावळसह मुंबई-भुसावळ-नागपूर दरम्यान धावणाऱ्या जवळपास ३६ पॅसेंजर गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :railwayरेल्वेAmravatiअमरावतीBhusawalभुसावळ