शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

श्रमिक रेल्वेने उत्तर प्रदेशचे १५४४ मजूर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:01 IST

श्रमिक एक्स्प्रेस २४ डब्यांची असून, त्यात अमरावती विभागातील १५४४ मजूर, कामगार बांधव रवाना झाले आहेत. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष ठाकरे, अमरावतीचे स्टेशन प्रबंधक महेंद्र लोहकरे, मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम यांच्यासह महसूल, रेल्वे, पोलीस प्रशासनाचे अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

ठळक मुद्देस्वगृही परतणार : रेल्वेला १० लाखांचे उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विभागातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या उत्तर प्रदेशातील १५४४ मजूर, कामगार बांधवांना स्वगृही पोहचविण्यासाठी विशेष श्रमिक एक्स्प्रेस बुधवारी सायंकाळी ६ वाजता अमरावती रेल्वे स्थानकाहून उत्तर प्रदेशच्या देवरियाकडे रवाना झालेत. अमरावती विभागात अडकलेल्या मजूर, कामगार बांधवांना स्वगृही सोडण्यासाठी ही विशेष श्रमिक एक्स्प्रेस विनाथांबा देवरियापर्यंत जाणार आहे.श्रमिक एक्स्प्रेस २४ डब्यांची असून, त्यात अमरावती विभागातील १५४४ मजूर, कामगार बांधव रवाना झाले आहेत. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष ठाकरे, अमरावतीचे स्टेशन प्रबंधक महेंद्र लोहकरे, मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम यांच्यासह महसूल, रेल्वे, पोलीस प्रशासनाचे अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. रेल्वे स्थानकावर प्रथमत: सर्व परप्रांतीय प्रवाशांंची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्या भोजन, चहा, पाणी व इतर व्यवस्था करण्यात आली. विभागातून ठिकठिकाणाहून आलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर घरी परतण्याचा आनंद झळकत होता. जिल्हाधिकारी शैलेश नवाल व अन्य अधिकाऱ्यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांना फिजिकल डिस्टन्स, मास्कचा वापर आदींबाबत आवाहन केले व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.श्रमिक ट्रेनमधून अमरावती जिल्ह्यातून ५००, अकोला २८०, यवतमाळ २२१, बुलडाणा ४४२ आणि वाशिम जिल्ह्यातील १०१ कामगार रवाना झाले आहेत. केंद्र सरकारने प्रतिव्यक्ती ६५० रुपये प्रवास भाडे रेल्वेला दिले असून, बुधवारी रवाना झालेल्या विशेष ट्रेनद्वारे १० लाख ३ हजार ६०० रूपये रेल्वेला उत्पन्न मिळाले आहे.संचारबंदीमुळे अनेक दिवसांपासून अडकून पडल्यामुळे कामगारांचा कुटुंबीयांशी केवळ मोबाइलद्वारे संपर्क होत होता. मात्र, शासनाने दखल घेऊन विशेष ट्रेनची व्यवस्था केली. त्यामुळे आम्हाला आमच्या कुटुंबीयांना, नातेवाइकांना अनेक दिवसांनी प्रत्यक्ष भेटता येणार आहे. घरी परतण्याचा आनंद मोठा आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी परप्रांतीय मजूर, कामगारांनी व्यक्त केली. दरम्यान गत आठवडाभरापासून पश्चिम बंगालकडे जाणाºया कामगारांसाठी रेल्वे उपलब्ध झाली नाही.