वरूड : शासकीय, निमशासकीय कर्मचारी, अधिकारी, डॉक्टरांना लस दिल्यानंतर आता ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ४ मार्चपासून कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. याकरिता को-विन अॅपवर नावनोंदणी करून लसीकरण केले जात आहे. यामध्ये १४२ ज्येष्ठ नागरिकांना तालुका वैद्यकीय कार्यालयात लसीकरण करण्यात आले. परंतु, गोरगरीब शेतमजुरांना या अॅपबद्दल माहिती नसल्याने ते वंचित राहण्याची शक्यता असल्याने जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता प्रशासनाकडून लसीकरण सुरू केले आहे. केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांकरिता शासकीय लसीकरण केंद्रात मोफत, तर खासगी रुग्णालयात २५० रुपयांत लस देण्यात येत आहे. लसीकरणामध्ये दोन दिवसांत १४२ ज्येष्ठ नागरिकांना तालुका वैद्यकीय कार्यालयात लसीकरण करण्यात आले. याकरिता तालुका वैद्यकीय अधिकारी, अमोल देशमुख, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार, आरोग्य सहायक नीता विरूळकर, नीलिमा बनवटे, वैशाली भुस्कुटे, स्नेहल शैतव, वैशाली गाडगे, धीरज फरकाडे, मीना युवनाते, सागर खारोडे, उज्ज्वला ठाकरे, राहुल वाडीकर यांचे पथक लसीकरण मोहिमेत सहभागी झाले आहे.