ग्रामविकास विभागाचे आदेश : त्वरित सोडत काढण्याचे निर्देशजितेंद्र दखने अमरावतीआगामी फेब्रुवारी २०१७ मध्ये जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका होवू घातल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील १४ पंचायत समितीचे आरक्षण तातडीने काढण्याचे निर्देश २२ जून रोजी ग्रामविकास विभागाने जिल्हा प्रशासनाला पत्राव्दारे कळविले आहे.जिल्ह्यातील १४ पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुका होत असल्याने राजकीय पुढारी कामाला लागले आहेत. तर प्रशासनानेही निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषद सोबतच पंचायत समितीच्याही एकत्र निवडणुका होणार आहे. काही दिवसापूर्वीच जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत मंत्रालयात काढण्यात आली आहे. मात्र पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत अद्यापही निघाली नसल्याने याकडेही राजकीय पक्षाच्या नजरा लागल्या आहे. अशातच आता राज्याच्या ग्रामविकास विभागाने बुधवारी जिल्ह्यातील १४ पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत तातडीने काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाला दिले आहेत. त्यानुषंगाने प्रशासनाने पुढील आठवड्यात पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण सोडत काढण्याचे दृष्टीने तयारी केली आहे. आगामी सभापती पदाची सोडत ही अडीच वर्षासाठी काढली जाणार आहे. येत्या जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील १४ पंचायत समितीपैकी धारणी आणि चिखलदरा पंचायत समिती वगळता उर्वरित १२ पंचायत समितीच्या निवडणूका होत आहे. असे आहे प्रवर्ग निहाय आरक्षणआगामी अडीच वर्षासाठी १४ पंचायत समितीचे सभापती पदासाठी पुढील आठवडयात आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात काढली जाणार आहे. यात जिल्ह्यातील १२ पंचायत समितीपैकी अनुसूचित जातीसाठी २ जागा राखीव राहणार आहेत. यात प्रत्येकी एक महिला व ओपन राहील, अनुसूचित जमातीकरिता एक़ ओपन, तर नामाप्रर् करिता ३ जागा राखीव राहणार आहेत
१४ पं. स. सभापती पदाची सोडत पुढील आठवड्यात
By admin | Updated: June 23, 2016 00:04 IST