शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

१३८ ग्रामपंचायतींमध्ये 'महिलाराज'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:30 IST

जिल्ह्यात नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाºया २५५ ग्रामपंचायतींची मतमोजणी मंगळवारी झाली.

ठळक मुद्देथेट सरपंचाचा बहुमान : व्यापक अधिकारांनी साधणार विकास

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाºया २५५ ग्रामपंचायतींची मतमोजणी मंगळवारी झाली. १३८ ग्रामपंचायतींमध्ये महिलांना प्रथमच थेट सरपंच होण्याचा बहुमान मिळाला. शासनाने थेट सरपंचांंना व्यापक अधिकार दिल्याने आता बहुमत नसले तरी या महिला सरपंचांना विनाअडसर गावाचा विकास साधता येणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव आहेत. महिला सबलीकरणासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे. त्यानुसार २५५ ग्रा.पं.मध्ये निवडणुकीनंतर 'महिलाराज' अस्तित्वात आले आहे. अनुसूचित जातीमधील २२, अनुसूचित जमातीमधील ३६, नागरिकांचा मागास प्रवर्गामधील ३१, तर सर्वसाधारण प्रवर्गातून ४९ महिला सरपंचपदी निवडून आल्या आहेत. अमरावती तालुक्यात १२ पैकी ८, भातकुली तालुक्यात १२ पैकी ७, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १७ पैकी ९, धामणगाव रेल्वे तालुक्यात ७ पैकी ६ चांदूर रेल्वे तालुक्यात १७ पैकी ८, चांदूर बाजार तालुक्यात २५ पैकी १४, तिवसा तालुक्यात १२ पैकी ७, मोर्शी तालुक्यात २४ पैकी ११, अंजनगाव सुर्जी तालुक्यात १३ पैकी ६, वरूड तालुक्यात २३ पैकी १२, दर्यापूर तालुक्यात २४ पैकी १३, अचलपूर तालुक्यात २३ पैकी १३, चिखलदरा तालुका २९ पैकी १४ व धारणीत १७ पैकी १० ग्रा.पं.मध्ये महिलाराज अस्तित्वात आले आहे.