शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, गोवा प्रवास आणि गुंतवणुकीच्या नावाखाली १३.२५ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 11:25 IST

तिघांविरुद्ध गुन्हे दाखल : 'माय सिक्युअर लाइफ' या बोगस कंपनीचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : दर आठवड्याला १० टक्के परतावा आणि मुंबई व गोवा पर्यटनाच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या 'माय सिक्युअर लाइफ' या बोगस कंपनीचा प्रताप तक्रारीनंतर उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी १३ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकारही उजोडात आला आहे. यामुळे फसवणुकीच्या गुन्ह्याखाली या बोगस कंपनीच्या कथित तीन संचालकांविरुद्ध पवनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंतवणूक केलेल्या रकमेपैकी १० टक्के रक्कम दर आठवड्याला परत करण्याचे आमिष दाखवून 'माय सिक्युअर लाइफ' कंपनीच्या योजनेत १३ लाख २५ हजार रुपयांची गुंतवणूक करून मुंबई, गोवा क्रूझ दूर करून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. ही घटना पवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. यातील आरोपींमध्ये अनिल चौधरी उर्फ ओंकार सावंत (४७, रा. पंतनगर, पूर्व मुंबई), राजेश रहांगडाले (३८, रा. चिचगाव, ता. गोरेगाव, जि. गोंदिया) आणि उमेश जाधव (४२, रा. ठाणे) यांचा समावेश आहे.

प्रवासाचे आणि १० टक्के गुंतवणुकीचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात अनुभव मात्र वेगळा आल्याने आपण फसवलो गेल्याची जाणीव गुंतवणूकदारांना झाली. त्यामुळे प्रवीण मुंडले यांनी पुढाकार घेत पवनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पवनी पोलिसांनी तिघाही आरोपींविरुद्ध वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सहायक पोलिस अधिकारी चांदेवार अधिक तपास करत आहेत.

असा घडला प्रकार या तिघाही आरोपींनी ५ ऑक्टोबर २०२३ रोजी गोव्यातील मडगाव येथे 'माय सिक्युअर लाइफ' या नावाने बनावट कंपनी उघडली. या माध्यमातून प्रवास आणि गुंतवणुकीची एक योजना तयार करून या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास दर आठवड्याला १० टक्के रक्कम परत करण्याचे आणि मुंबईला, गोवा कूझ दूर करण्याचे ग्राहकांना आश्वासन दिले. राजेश रहांगडाले व उमेश जाधव यांनी पवनी गाठून प्रवीण मुंडले (३९, रा. शिवाजी चौक, पवनी) व इतरांना विश्वासात घेऊन अधिक लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी त्यांच्याकडून १३ लाख २५ हजार रुपये उकळले.

टॅग्स :fraudधोकेबाजीAmravatiअमरावती