शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १२७३ ग्राहकांचे कृषी वीजबिल झाले कोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:17 IST

भातकुली/दर्यापूर : महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानादरम्यान जिल्ह्यातील १२७३ शेतकऱ्यांनी आपले कृषी देयके कोरे करून घेतले ...

भातकुली/दर्यापूर : महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानादरम्यान जिल्ह्यातील १२७३ शेतकऱ्यांनी आपले कृषी देयके कोरे करून घेतले आहे.

या अभियानाअंतर्गत ७० टक्क्यांपर्यंत सवलतीचा लाभ घेतलेल्या जिल्ह्यातील १२७३ शेतकºयांमध्ये प्रामुख्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील व मोर्शी तालुक्यातील प्रत्येकी १८२ शेतकऱ्यांचा सहभाग आहे. याच सोबत शेंदूरजना घाट ९५, बडनेरा ८८, वरूड ११८, भातकुली ७५, धामणगाव येथील ८८, अचलपूर ८०, अंजनगाव २२, चिखलदरा ३०, दर्यापूर ६, धारणी १५, चांदूरबाजार ७३, चांदूर रेल्वे येथील ६२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. महावितरणचे महा कृषी ऊर्जा अभियानात सर्व उच्च व लघुदाब कृषिपंप ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्राहकांच्या ५ वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात आला आहे. तसेच ५ वर्षांपर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार १०० टक्के माफ करून व्याज हे १८ टक्क्यांऐवजी त्या-त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याजदरानुसार आकारण्यात येत आहे.

--------------