शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कंत्राटदारांना १२.५० कोटी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:12 IST

सुमारे ९० कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी महापालिकेच्या विकास कामांवरील बहिष्कार कंत्राटदारांनी मंगळवारी मागे घेतला.

ठळक मुद्देसंप मिटला : महापालिकेत आनंदीआनंद, आजी-माजींची मध्यस्थी

आॅनलाईन लोकमतअमरावती : सुमारे ९० कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी महापालिकेच्या विकास कामांवरील बहिष्कार कंत्राटदारांनी मंगळवारी मागे घेतला. थकबाकीपोटी एकमुस्त १२.५० कोटी रुपये महापालिकेच्या कंत्राटदारांना देण्यास प्रशासन तयार झाल्याने हा तिढा सुटला. पाच महिन्यांपासून उपसलेले बहिष्काराचे अस्त्र कंत्राटदारांनी म्यान केल्याने प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला. महापौर संजय नरवणे आणि माजी महापौर विलास इंगोले यांच्या मध्यस्थीने प्रशासन बांधकाम कंत्रादारांना १२.५० कोटी रुपये देण्यास तयार झाले. त्यामुळे सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक व प्रशासनाचे कंत्राटदारांनी आभार मानलेत.महापालिकेने सुमारे ९० कोटी रुपये थकविल्याने या कंत्राटदारांनी काळी दिवाळी साजरी करुन प्रशासनाचा निषेध केला होता. त्यांनी महापालिकेच्या सर्व नवीन कामांवर बहिष्कार घातल्याने शहरात एकही नवीन काम सुरु झाले नाही. हा तिढा सोडविण्यासाठी अनेक स्तरावर बैठकी झाल्या. मात्र बोलणी फिस्कटल्याने कंत्राटदार बहिष्कारावर ठाम राहिले. मात्र मंगळवारची बोलणी यशस्वी ठरली.राज्यशासनाने जीएसटी अनुदानापोटी १८.९३ कोटी रुपये दिल्याने त्यातील ११ कोटींची वाढीव रक्कम आपल्याला द्यावी, अशी मागणी मंगळवारी कंत्राटदार असोशिएशनने केली. माजी महापौर विलास इंगोले, विरोधीपक्षनेता बबलू शेखावत यांनी त्यांचे नेतृत्व केले. त्या बैठकीत ८ कोटी रुपये कंत्राटदारांना देण्याची तयारी आयुक्तांनी दाखविली. महावितरण व जिल्हाधिकारी कार्यालयाला एकूण पाच कोटी रुपये द्यायचे असल्याने कंत्राटदारांना ८ कोटी रुपये देणे शक्य असल्याचे मत मांडण्यात आले. त्यानंतर महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, स्थायी सभापती तुषार भारतीय, सभागृहनेता सुनील काळे व ज्येष्ट सदस्य प्रकाश बन्सोड, विजय वानखडे, अजय गोंडाणे यांनी आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर या कंत्राटदारांना १२.५० कोटी रुपये देण्यावर प्रशासनाच्यावतीने शिक्कामोर्तब करण्यात आले. जीएसटी अनुदानातील रकमेसह काही रक्कम मालमत्ता कर व एलबीटीतून दिली जाईल.प्रत्येकाला १२.५० टक्के रक्कममहापालिकेतील १०० हून अधिक बांधकाम कंत्राटदारांचे सुमारे ९० कोटी रुपये प्रशासनाकडे थकले आहेत. त्यातील १२.५० कोटी रुपये देण्याचा निर्णय मंगळवारी झाला. त्यानुसार आता प्रत्येक कंत्राटदाराला त्याच्या एकूण थकीत देयकाच्या १२.५० टक्के रक्कम दिली जाणार आहे. या निर्णयामुळे कंत्राटदारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.