शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

१.२५ लाख विद्यार्थ्यांनी भरले ऑनलाईन परीक्षा अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:15 IST

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने यावर्षीपासून सुरू केलेल्या ऑनलाईन परीक्षा अर्जप्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. फेब्रुवारी ...

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने यावर्षीपासून सुरू केलेल्या ऑनलाईन परीक्षा अर्जप्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यात १.२५ लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा अर्ज भरले असून, ९० हजार विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नामांकन नोंदणी पूर्णत्वास आली आहे.

ऑनलाईन परीक्षा अर्ज आणि नामांकन हे यंदा विद्यापीठाचे नवीन उपक्रम ठरले आहे. सर्व शाखांच्या अभ्यासक्रमांना असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा अर्ज भरणे बंधनकारक केले आहे. ऑनलाईन परीक्षा अर्ज कोणत्याही सायबर कॅफेमधून भरता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यापीठाने पाेर्टलवर ऑनलाईन परीक्षा अर्ज उपलब्ध केला असून, तो ऑफलाईन अर्ज महाविद्यालयात विद्यार्थ्यांना जमा करावा लागणार आहे. पाच-दहा मिनिटांत ऑनलाईन अर्ज विद्यार्थी भरू शकतो, अशी सुविधा करण्यात आली आहे. हिवाळी २०२० परीक्षांसाठी कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, फार्मसी व अन्य पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या १, ३, ५, ७ व ९ अशा विषम सत्राच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन परीक्षा अर्ज स्वीकारले जात आहेत. ऑनलाईन परीक्षा फाॅर्म विद्यापीठाचे आयसीआरकडून लर्निंग स्पायरलच्या माध्यमातून विद्यापीठाच्या पोर्टलवर उपलब्ध करण्यात आले आहे. विषम सत्राच्या परीक्षार्थींची सुमारे अडीच लाख विद्यार्थिसंख्या असून, आतापर्यंत १.२५ लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा अर्ज केले आहेत.

-------------------

ऑनलाईन नामांकन प्रकियेला पसंती

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जिल्ह्यात ८ मार्चपर्यत ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महाविद्यालयांचे कामकाज बंद आहे. असे असले तरी २८ फेब्रुवारीपर्यंत सुमारे ९० हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नामांकन पूर्ण केल्याची माहिती आहे. महाविद्यालये पूर्ववत होताच ऑनलाईन नामांकन प्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा नोंदणी प्रक्रिया आरंभली जाणार आहे.

---------------------

परंपरागत परीक्षा अर्ज आता कालबाह्य झाले आहे. यूजीसीच्या गाईडलाईननुसार विद्यापीठाचा ऑनलाईन कारभार अपेक्षित आहे. त्यानुसार ऑनलाईन परीक्षा अर्ज व नामांकन सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत १.२५ लाख परीक्षा फाॅर्म, तर ९० हजार ऑनलाईन नामांकन नोंदणी झाली आहे.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, विद्यापीठ.