सन २०४८ पर्यंत नियोजन : वाढीव पाणीपुरवठा टप्पा-२अमरावती : केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत अमरावतीत वाढीव पाणीपुरवठा टप्पा- २ मध्ये १२२.५८ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. सन - २०४८ पर्यंत लोकसंख्येचा वेध घेत पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. आ. सुनील देशमुख यांनी अमृत योजना मंजुरीसाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न केले आहे.राज्यभर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असताना अमरावतीकरांना पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवली नाही. दादासाहेब गवई, सुदामकाका देशमुख, बी.टी. देशमुख यांच्या महत्प्रयासाने सन १९८३ साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मुहूर्तमेढ रोवली. पाणी पुरवठा योजना टप्पा १ अंतर्गत आजतागायत पाणीपुरवठा महानगरात केला जात आहे. शहरात पाणीपुरवठा उर्ध्ववर्धा धरणातून करण्यात येत असून योजनेचे तपोवन परिसरात ९५ दशलक्ष लीटर क्षमतेचे जलशुद्धिकरण केंद्र साकाराले आहे. १६ जलकुंभ व जलवाहिन्यांद्वारे दररोज ११५ द.ल. ली एवढा पाणीपुरवठा महानगरात केला जातो. मात्र जुन्या पाणीपुरवठा योजनेचे आयुर्मान २०१६ मध्ये संपुष्टात येणार आहे. त्यामुळे महानगराचा पाणी पुरवठा योजनेचा विकास आराखडा तयार केला गेला. केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेतून वाढीव पाणी पुरवठ्यासाठी १२२.५८ कोटी मंजूर झाल्यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी समस्येवर मात करता येणार आहे. तपोवन येथे २.० मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्याचा वैशिष्टपूर्ण कामांचा यात समावेश आहे.
'अमृत'चे १२२.५८ कोटी मंजूर
By admin | Updated: June 25, 2016 00:04 IST