शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

हॉकर्सकडून वसुलणार वर्षाकाठी १.२१ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 05:00 IST

महापालिका क्षेत्रातील अधिकृत व मंजूर हॉकर्स झोनसह अन्य जागांवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांकडून यापूर्वी प्रत्येकी पाच रुपये दिवसाकाठी वसूल करण्यात येत होते. तथापि, गत काही वर्षांपासून ही रक्कम १० रुपये करण्यात आली. २०१७ मध्ये तत्कालीन आयुक्त हेमंत पवार यांच्या कार्यकाळात त्यासाठी १.५३ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली. मात्र,  निविदाधारक समोर आला नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावर दैनंदिन वसुलीचे कंत्राट देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांकडून वर्षाकाठी १.२१ कोटी वसूल होण्याचा मानस महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. दैनिक शुल्क म्हणून ही रक्कम आकारण्यात येणार आहे. ११ एप्रिल रोजी त्यासाठीची निविदा काढण्यात आली. गतवर्षी शहरातील फेरीवाल्यांकडून २८ लाख शुल्क वसूल करण्यात आले होते.महापालिका क्षेत्रातील अधिकृत व मंजूर हॉकर्स झोनसह अन्य जागांवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांकडून यापूर्वी प्रत्येकी पाच रुपये दिवसाकाठी वसूल करण्यात येत होते. तथापि, गत काही वर्षांपासून ही रक्कम १० रुपये करण्यात आली. २०१७ मध्ये तत्कालीन आयुक्त हेमंत पवार यांच्या कार्यकाळात त्यासाठी १.५३ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली. मात्र,  निविदाधारक समोर आला नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावर दैनंदिन वसुलीचे कंत्राट देण्यात आले. मात्र आता कोरोना काळ संपुष्टात आल्याने त्यासाठी १ कोटी २० लाख ९९ हजार ७५० रुपये किमतीची निविदा काढण्यात आली आहे. अर्थात महापालिकेकडे नोंदणीबद्ध असलेल्या ३३१५ हॉकर्सकडून १० रुपये दैनिक शुल्कापोटी वर्षभरात तितकी रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा होण्याचा आशावाद प्रशासनाने बाळगला आहे.

शहरात ३३१५ नोंदणीबध्द हॉकर्स सन २०१७ मध्ये महापालिकेच्या  बाजार व परवाना विभागानुसार महापालिका क्षेत्रात ४१२८ फेरीवाल्यांनी नोंदणी केली होती. त्यापेकी १६५३ फेरीवाल्यांनी परवान्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली होती. मात्र, त्यानंतर शासनाने केलेल्या सर्वेक्षणात ती संख्या घटली. तूर्तास त्या सर्वेक्षणानुसार महापालिका हद्दीत एकूण ३३१५ नोंदणीबध्द फेरीवाले आहेत. पैकी २१०० जणांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. ३३१५ ही संख्या डोळ्यासमोर ठेऊन १.२१ कोटी रुपये मूल्याची निविदा काढण्यात आली आहे.

कंत्राट एक वर्षांचेमहापालिका क्षेत्रातील सर्व फेरीवाल्यांकडून प्रतिदिन १० रुपये दैनिक फी वसुलीचे हे कंत्राट १ वर्षांचे असेल. विशेष म्हणजे महापालिकेच्या थकबाकीधारकास कंत्राट घेता येणार नाही. त्याला तो दुसऱ्याला देता देखील येणार नाही. फेरीवाल्यास पावती देताना त्यावर फेरीवाल्याचे नाव, झोन क्रमांक व मोबाईल नंबर टाकणे बंधनकारक असेल.

 

टॅग्स :hawkersफेरीवाले