शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

कोजागिरीसाठी १२ हजार लिटर दूध

By admin | Updated: October 27, 2015 00:08 IST

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अमरावतीकरांनी सोमवारी १२ हजार लिटर दूधाची मागणी केली होती.

संदीप मानकर अमरावतीकोजागिरी पौर्णिमेनिमित्त अमरावतीकरांनी सोमवारी १२ हजार लिटर दूधाची मागणी केली होती. या मागणीत सातत्याने वाढ झाली. त्यामुळे अतिरिक्त पाच हजार लिटर दुधाची तरतूद करून ठेवल्याचे दुग्ध विकास योजनेच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कोजागिरी पौर्णिमेला हिंदू संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे. चंदामामाला साक्षी ठेवून जिल्हाभर कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येते. सन २०१४ मध्ये ६ ते ७ हजार लिटर दुधाचा मागणीनुसार पुरवठा करण्यात आला होता. यावर्षी यामध्ये ५ हजार लिटर दुधाची वाढ झाली आहे. शेतकरीवर्ग दुग्ध व्यवसायाकडे वळल्यामुळे दूध उत्पादनात वाढ झाल्याचे दुग्ध शाळा व्यवस्थापक एस. बी. जांभुळे यांनी सांगितले. मागच्या वर्षी २१ लाख लिटर दुधाचे वार्षिक संकलन होते. यावर्षी त्यामध्ये वाढ होऊन दूध संकलन २५ ते २६ लाख लिटरवर आल्याचे कळते. शहरात दररोज रोज ४ हजार लिटर दुधाची मागणी असते. कोजागिरीमुळे ही मागणी १२ ते १५ हजार लिटरवर गेली आहे. दूध संकलनात वाढ दुधात भेसळीची शक्यतादुधातील फॅट व सॉलिड नॉट फॅटचे प्रमाण प्रमाणित नसेल तर ती भेसळ मानली जाते. दुधात पाणी किंवा इतर केमिकलयुक्त पदार्थ टाकून भेसळ केली जाते. कोजागिरीनिमित्त दुधाची मोठी उलाढाल झाली. त्यामुळे भेसळयुक्त दुधाची विक्री करताना आढळल्यास अन्न औषधी प्रशासन विभाग कारवाई करणार आहे. यासाठी एक पथक नेमण्यात आले आहे. ५ लाख लिटरने वाढले वार्षिक संकलन शेतकऱ्यांचा ओढा दुग्ध व्यवसायाकडे वाढल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत दूध संकलनात ५ लाख लिटरने वाढ झाली असून वार्षिक उलाढाल २५ ते २६ लाख लिटरच्या घरात गेली आहे. दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस आल्याचे हे संकेत म्हणता येईल. शेतकऱ्यांनी पूरक व्यवसाय म्हणून दूध उत्पादनाला पसंती दिली आहे. अमरावतीत २५ दूध डेअऱ्याअन्न व औषधी प्रशासन विभागांतर्गत २५अधिकृत परवानाधारक दूध डेअरी आहेत. येथे हजारो लिटर दुधाची विक्री होते. दुधाच्या उलाढालीमुळे सोमवारी दुधाचे भाव वधारले होते. कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी केली जाते. घरोघरी कोजागिरीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन होते. चांदण्यांमध्ये दूध आटवले जाते. त्यात मध्यरात्री पूर्णचंद्राचे प्रतिबिंब पडले की ही कोजागिरी प्राशन केली जाते. आरोग्यसंवर्धनासाठी देखील कोजागिरीचे दूध महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे सोमवारी सर्वच दूध डेअऱ्यांमध्ये गर्दी होती. शेतकऱ्यांनी पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय निवडल्यामुळे वार्षिक उत्पन्नात वाढ झाली आहे. सोमवारी १२ हजार लिटर दुधाची तरतूद करण्यात आली आहे. - एस.बी. जांभुळे,दुग्धशाळा व्यवस्थापक, अमरावती.