शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

महापालिकेच्या रोजगार मेळाव्यात ११४० ‘इंटरव्ह्यू’

By admin | Updated: March 8, 2017 00:15 IST

येथील आयटीआयमध्ये महापालिकेच्यावतीने मंगळवारी घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात सुमारे ११४० जणांनी नामांकित कंपन्यासाठी मुलाखती दिल्या.

एनयूएलएमचा पुढाक ार : २११० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण अमरावती : येथील आयटीआयमध्ये महापालिकेच्यावतीने मंगळवारी घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात सुमारे ११४० जणांनी नामांकित कंपन्यासाठी मुलाखती दिल्या. त्यातील बहुतांश जणांना कॉल लेटर देण्यात आले. उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्या नेतृत्वात हा रोजगार मेळावा घेण्यात आला. १३५० जणांनी यासाठी नोंदणी केली होती. दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत रोजगार व स्वंयरोजगार प्रशिक्षण पूर्ण झालेले व सुरू असलेल्या लाभार्र्थींना मुलाखतीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपायुक्त वानखडे यांनी दिली. आयुक्त हेमंत पवार, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजता या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.अभियानाअंतर्गत या मेळाव्यासाठी स्थानिक स्तरावरील कंपन्यांसह राष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यांना पाचारण करण्यात आले होते. यात रेमंडसह, जाधव ग्रुप व अन्य कांपन्यांचा समावेश होता. विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी ११४० विद्यार्थी बरोजगारांच्या मुलाखती घेतल्या.त्यातील बहुतांश जणांना आॅन दी स्पॉट आॅर्डर देण्यात आली. महापालिका क्षेत्रातील दारिय्ररेषेखालील कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्नात वाढ करून त्यांना दारिद्र्यरेषेवर आणणे हा या अभियानाचा उद्देश आहे.या मेळाव्याला जवळजवळ १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या मेळाव्यामध्ये रेमंड, व्ही.एच. एम., श्याम इंडोफेम, जॉब स्क्वेअर, स्काय प्लेसमेंट, अस्पा बंड सन्स, प्लॉस्टी सर्ज, व्हिडीओकॉन, कोटक फायनास, युरेसा फोब्जर्स, कॉगनेट टेक, एल अ‍ॅन्ड फायनांस, आॅक्सनेट प्लेसमेंट, टीव्हीएस कंपनी, योशिका इंजिनिअरींग, मोडटेक्स फॅशन, रेग्जा गारमेंट सहभागी होत्या. या मेळाव्यात अनेक विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. या कंपन्या व्यतिरिक्त बँक आॅफ इंडिया देवरणकरनगर, पंजाब नॅशनल बँक राजकमल चौक, बँक आॅफ महाराष्ट्र बडनेरा, एच. डी. एफ. सी. बँक, इंडियन ओवरसिझ बँक यांनीही सहकार्य केले. सदर मेळाव्यामध्ये दीनदयाळ अंतोदय योजना-राष्ट्रीय नागरिक उपजिविका अभियान अंतर्गत रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण पूर्ण झालेले व सुरू असलेल्या लाभार्थींना मुलाखतीच्या माध्यमातून निवड करून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. (प्रतिनिधी)