शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील १,१२६ सहकारी संस्था अवसायनात; सहकार विभाग ताण कमी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 19:13 IST

सहकार विभागांतर्गत एकट्या पश्चिम विदर्भातील १,१२६ सहकारी संस्था विविध कारणांमुळे अवसायनात काढल्याने या विभागाचे अधिकारी व कर्मचा-यांवर कामाचा ताण वाढला आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : सहकार विभागांतर्गत एकट्या पश्चिम विदर्भातील १,१२६ सहकारी संस्था विविध कारणांमुळे अवसायनात काढल्याने या विभागाचे अधिकारी व कर्मचा-यांवर कामाचा ताण वाढला आहे. यासाठी आता अवसायकांची नामतालिका (पॅनल) करण्याचे निर्देश सहकार आयुक्तांनी दिले आहेत. यासाठीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. राज्य सरकारने विविध कारणांमुळे बंद असलेल्या सहकारी संस्थांच्या शुद्धीकरणाची मोहीम हाती घेतली. यामध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ व ११० (अ) अन्वये राज्यातील १७ हजार १८८ संस्थांचे कामकाज बंद आढळल्यामुळे या संस्था अवसायनात काढल्या. यामध्ये नागरी बँका, पतसंस्था, सुतगिरण्या यासह सहकार व पणन विभागाच्या संस्थांचा समावेश आहे. या सहकारी संस्थामध्ये अनेक वर्षांपासून लेखापरीक्षण नसणे, आर्थिक घोटाळे, व्यवस्थापन मंडळाचा चुकीचा कारभार, अनेक वर्षांपासून निवडणुका रखडणे यासह अन्य कारणांमुळे या संस्था सहकार विभागाच्या स्पेशल ड्राईव्हमध्ये अवसायनात निघाल्या. या सर्व संस्थांवर सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचाºयांना अवसायक म्हणून नियुक्त केले. सहकार विभागात अनेक वर्षांपासून कर्मचारी भरती झालेली नाही. त्यामुळे आधीच अधिकारी व कर्मचाºयांवर कामाचा भार असतांना आता अवसायनातील संस्थांचा अधिभार आल्याने कर्मचाºयांवर कामाचा ताण वाढला आहे. परिणामी अवसायकांची नियुक्ती करण्यासाठी अशासकीय व्यक्तींचे पॅनल तयार केले जाणार आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ४५२ संस्थाअमरावती विभागात १,१२६ संस्था मागील तीन वर्षांत अवसायनात निघाल्या. यामध्ये सर्वाधिक ४५२ संस्था यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. अमरावती २९०, अकोला १२३, वाशिम ६५ व बुलडाणा जिल्ह्यातील १९६ सहकारी संस्थाचा समावेश आहेत.निवृत्त न्यायाधीश, निवृत्त विधी अधिकारी, अ‍ॅडव्होकेट, सनदी लेखापाल, कॉस्ट अकौऊंट, कंपनी सेक्रेटरी, राष्ट्रीयीकृत किंवा सहकारी बँकेचे व्यवस्तापकापेक्षा कमी दर्जा नसलेले अधिकारी व कर्मचारी, सहकार विभागाचे वर्ग १ व २ अधिकारी, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी, कंपनी लिव्किडेटर, सहकारी संस्थाचे किमान १० वर्षांचा अनुभव असलेले लेखापरीक्षक यांचा नामतालिकेसाठी विचार केला जाणार आहे. सहकार आयुक्तांद्वारा यासाठी पॅनल तयार करण्यात येणार आहे. यांना कलम ८८ व ८९ अन्वये अधिकार राहतील. जिथे आवश्यकता वाटल्यास त्या संस्थेवर लिक्विडेटर नियुक्त करण्यात येईल. याद्वारे सहकार विभागावरील कामाचा ताण कमी होईल.- राजेंद्र दाभेराव, विभागीय सहनिबंधक

टॅग्स :Amravatiअमरावती