शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

११० आदिवासींविरुद्ध चिखलदरा पोलिसात गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 19:03 IST

केलपाणी जंगलात मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलीस, सीआरपीएफ, वनाधिकारी-कर्मचारी यांच्यावर हल्ला करणा-या ११० आदिवासींविरुद्ध सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनेश तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले आहेत. 

चिखलदरा (अमरावती) - केलपाणी जंगलात मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलीस, सीआरपीएफ, वनाधिकारी-कर्मचारी यांच्यावर हल्ला करणा-या ११० आदिवासींविरुद्ध सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनेश तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले आहेत. पुनर्वसित आठ गावांतील आदिवासी गाव सोडून गाभा क्षेत्रातील मूळ गावी केलपानी येथे १५ जानेवारीपासून ठाण मांडून होते. त्यांना समजावण्यासाठी गेलेल्या वनाधिकारी-कर्मचारी, पोलीस, सीआरपीएफच्या जवानांवर त्यांनी काठ्या, कुºहाडी, कुकरी, मिरची पूड, काचकुहिरी टाकून अचानक हल्ला केला. यात वनविभागाचे ५० अधिकारी, कर्मचारी, सीआरपीएफ व पोलीस कर्मचारी गंभीर व किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनेश तायडे यांच्या फिर्यादीवरून ११० आदिवासींविरुद्ध हत्येचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा, मारहाण, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, बीपी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर आठही गावांमध्ये असलेल्या पुनर्वसित आदिवासींमध्ये दहशत पसरली आहे. काही दिवस अटकेची कारवाई स्थगित असली तरी अधिकारी-कर्मचा-यांवर मोठ्या प्रमाणात झालेला हल्ला पाहता, त्यांना अटक केले जाणार आहे. गोळीबार नव्हे, अश्रुधुराच्या नळकांड्याआदिवासींनी अचानक शासकीय अधिकारी कर्मचा-यांवर हमला करताच  त्यांना पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या असल्याचे  चिखलदराचे ठाणेदार आकाश शिंदे यांनी गुरुवारी पुन्हा स्पष्ट केले.  जखम पायाला कशी?अश्रुधुराच्या गनमधून हवेची दिशा पाहून वर फायर केले जाते. त्याचा आवाज होतो व सर्वत्र धूर पसरतो. असे असताना चंपालाल पेठेकर च्या पायाला अश्रुधुराचे नळकांडे कसे लागले, हे अजूनही अनुत्तरित आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र