शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
3
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
4
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
5
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
8
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
9
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
11
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
12
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
13
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
14
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
15
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
16
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
17
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
18
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
19
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
20
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका

मेळघाटात २२ वर्षांत ११, ४३६ बालमृत्यू,  आदिवासी ‘मतदार’ नाहीत का?, खोज संघटनेनं पंतप्रधानांना पत्राद्वारे कळवली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 19:10 IST

आदिवासीबहुल भाग असलेल्या मेळघाटात १९९६ ते २०१७ या २२ वर्षांत ११ हजार ४३६ बालमृत्यू झाले आहेत. शासन, प्रशासनाच्या अनास्थेने ही बालमृत्यूची सरासरी वर्षाला ५१९ इतकी आहे. मातामृत्यूदेखील गंभीर बाब असल्याचे मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेतून मांडली आहे.

गणेश वासनिक/ अमरावती, दि. 31 - आदिवासीबहुल भाग असलेल्या मेळघाटात १९९६ ते २०१७ या २२ वर्षांत ११ हजार ४३६ बालमृत्यू झाले आहेत. शासन, प्रशासनाच्या अनास्थेने ही बालमृत्यूची सरासरी वर्षाला ५१९ इतकी आहे. मातामृत्यूदेखील गंभीर बाब असल्याचे मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेतून मांडली आहे. त्यामुळे आदिवासी ‘मतदार’ नाहीत काय, असा सवाल भोळ्या, भाबड्या आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे. मेळघाटातील ‘खोज’ संघटनेचे बंड्या साने, पुर्णिमा उपाध्याय व दशरथ बावनकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्राद्वारे आदिवासींच्या व्यथा मांडल्या आहेत. बालमृत्यू हे कुपोषणामुळे होत असल्याने मेळघाटातील प्रश्न, समस्या जाणून घेणे आणि उपाययोजना करण्यासाठी १९९३ पासून राज्यपाल, न्यायमूर्ती, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री ते विविध आघाड्यांवर काम करणाºया पुढाºयांनी दौरे करून आदिवासींना भेटी दिल्या आहेत. मात्र मेळघाटचे बालमृत्यू, मातामूत्यू ही समस्या ‘जैसे थे’ आहे. तसेही १९९३ पासून तर आजतागायत मेळघाटातील समस्या, प्रश्नांविषयी उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर केवळ ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. परंतु जनहित याचिकेसाठी काम करणारे वकील कधीही मेळघाटात आले नाहीत, हे वास्तव आहे. कधीकाळी मेळघाटातील बालमृत्यूची न्यायालयात याचिका दाखल करून आदिवासींना न्याय मिळवून देण्याची भाषा करणारे वकील मात्र आज महाधिवक्ता झाले आहेत. कालपर्यंत विरोधी पक्षात असणारे नेते आज सत्ताधारी झाले आहेत. मेळघाटात देश आणि राज्य पातळीवरील नेते, न्यायाधीश, वकील, अधिकारी, संत-महंतांनी दौरे केले आहेत. परंतु बालमृत्यू नियंत्रणार्थ कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे महानुभावांचे हे दौरे केवळ निर्जिव ठरले आहेत. बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण दिवसागणिक वाढत असताना आदिवासी मुलांना मृत्युच्या दाढेत ढकलण्याचे कर्तव्य शासनकर्ते करीत आहेत. आदिवासींसाठी धोरण, उपाययोजना, बजेट किंवा निधीची तरतूद केली जात नाही, ही बाब आवर्जून विशद करण्यात आली आहे. मेळघाटात आरोग्य सुविधा, पोषण आहार, बालरोग तज्ञ्ज, रुग्णालयांची दैनावस्था, डॉक्टरांची वानवा, परिचारिका, अंगणवाड्यांची दुरवस्था अशा एक ना अनेक समस्या, प्रश्न कायम आहेत. माता व बालमृत्यू रोखण्यासाठी शासन, प्रशासनाने नियोजनबद्ध आराखडा तयार करणे काळाची गरज असून अन्यथा मृत्यूचे सत्र असेच सरू राहील, अशी कैफियत बंड्या साने, पुर्णिमा उपाध्याय यांनी पंतप्रधान मोदींकडे मांडली आहे.मेळघाटातील बालमृत्यू रोखण्यासाठी शासन, प्रशासनाविरुद्ध अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. मात्र, नियोजनाअभावी कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्युचे सत्र थांबत नाही. त्यामुळे ही समस्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडवावी, यासाठी त्यांना थेट पत्र लिहिले आहे. - बंड्या साने, प्रमुख, ‘खोज’ संस्था मेळघाट