शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

निधीअभावी रखडलेले 104 प्रकल्प ‘बळीराजा नवसंजीवनी’च्या कक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 16:30 IST

राज्यात निधीअभावी रखडलेले २१ मुख्य व ८३ लघु अशा एकूण १०४ प्रकल्पांची कामे आता शासनाच्या ‘बळीराजा नवसंजीवनी’ या नव्या योजनेंतर्गत पूर्ण होणार आहेत.

- गजानन मोहोडअमरावती- राज्यात निधीअभावी रखडलेले २१ मुख्य व ८३ लघु अशा एकूण १०४ प्रकल्पांची कामे आता शासनाच्या ‘बळीराजा नवसंजीवनी’ या नव्या योजनेंतर्गत पूर्ण होणार आहेत. यासाठी ६ हजार ५९१ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. या प्रकल्पांसाठीच्या निधीच्या २५ टक्के म्हणजेच १ हजार ६४७ कोटी रुपयांचा निधी केंद्र शासन देणार आहे, तर उर्वरित निधी नाबार्डच्या माध्यमातून केंद्र शासनच कर्जस्वरूपात उपलब्ध करणार आहे.

राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळप्रवण १४ जिल्ह्यांतील प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. त्यात विदर्भात रखडलेल्या ८१ प्रकल्पांचा समावेश आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी ३,८३६ कोटींचा निधी आवश्यक आहे. यातील ९५९ कोटी केंद्र शासन देणार आहे व उर्वरित २,८७७ कोटी केंद्र शासनच नाबार्डकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध करणार आहे. यामुळे विदर्भाचा सिंचन अनुशेष दूर होऊन १ लाख ६ हजार ३२९ हेक्टरने सिंचनक्षेत्र वाढेल. ही विदर्भासाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.

जलसिंचन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १४ जिल्ह्यांमध्ये अर्धवट स्थितीत असलेल्या या १०४ प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्यावर १ लाख ४० हजार ३५ हेक्टरने सिंचन क्षेत्रवाढ होणार आहे. यामध्ये मराठवाड्यातील सात जिल्ह्यांत ३९ हजार ७०६ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. यासोबतच १,८८१.७३ दलघमी पाण्याच्या साठ्यातदेखील वाढ होणार आहे. यामुळे कमी पावसाच्या विदर्भ व मराठवाड्यातील जलस्तरदेखील उंचावणार आहे. या विषयीचा प्रस्ताव राज्य शासनाने ३१ मे २०१६ रोजी केंद्राच्या जलसंधारण विभागाला पाठविला, मात्र सचिव पातळीवरच रखडला होता. यामधील मुख्य २१ प्रस्तावांना केंद्रीय जल आयोग व नीती आयोगाची परवानगी बाकी होती. आता मात्र या मंत्रालयाचा कारभार नितीन गडकरी यांच्याकडे असल्यामुळे बळीराजा नवसंजीवनी योजनेने विदर्भ व मराठवाड्याला खऱ्या अर्थाने संजीवनी मिळणार आहे.

जिल्हानिहाय सिंचन क्षमता वाढ* जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार विदर्भात १ लाख ६ हजार ३२९ सिंचनक्षेत्र वाढणार आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ४२ हजार ४३० हेक्टर, अकोला २९ हजार ६१५, वाशिम ११ हजार ७५, यवतमाळ १३ हजार ६४९, बुलडाणा ५ हजार ४२४ व वर्धा ४ हजार ४२४ हेक्टर सिंचन क्षेत्रवाढ प्रस्तावित आहे.

* मराठवाड्यात या प्रकल्पानंतर ३९ हजार ७०६ हेक्टर सिंचन क्षेत्रवाढ होणार आहे. यामध्ये औरंगाबाद १६ हजार ९६६ हेक्टर, जालना ४ हजार २८५, परभणी २ हजार १००, नांदेड ७ हजार ७७८, लातूर ६ हजार ३५०, उस्मानाबाद १ हजार ७८५ व बीड जिल्ह्यात ४४२ हेक्टर सिंचन क्षेत्रवाढ प्रस्तावित आहे.

शेतकरी आत्महत्याप्रवण व दुष्काळबाधित १४ जिल्ह्यांसाठी शासनाचे हे  पॅकेज आहे. २५ टक्के निधी केंद्राचा व उर्वरित निधीदेखील केंद्र शासनाच्या माध्यमातून नाबार्ड कर्जरूपात देणार आहे. यामुळे सिंचनाचा अनुशेष कमी होईल.- प्रवीण पोटे, बांधकाम, उद्योग राज्यमंत्री