शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

१५२ पैकी १०१ विस्थापित शिक्षकांचे समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 01:29 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत १३१ शिक्षक विस्थापित झाले होते, तर २१ शिक्षकांनी बदलीचा अर्जच दाखल केला नाही. अशा एकूण १५२ शिक्षकांपैकी ५१ शिक्षकांनी न्यायालयातून ‘जैसे थे’चा आदेश मिळविला आहे. त्यामुळे २ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद प्रशासनाने १०१ शिक्षकांची समुपदेशनद्वारा पदस्थापना दिली.

ठळक मुद्देशिक्षक बदली : ५१ शिक्षक जैसे थे ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत १३१ शिक्षक विस्थापित झाले होते, तर २१ शिक्षकांनी बदलीचा अर्जच दाखल केला नाही. अशा एकूण १५२ शिक्षकांपैकी ५१ शिक्षकांनी न्यायालयातून ‘जैसे थे’चा आदेश मिळविला आहे. त्यामुळे २ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद प्रशासनाने १०१ शिक्षकांची समुपदेशनद्वारा पदस्थापना दिली. यामध्ये २६ शिक्षकांना सपाटीवर, तर उर्वरित ७५ शिक्षकांना मेळघाटात नियुक्ती देण्यात आली.जि.प. प्राथमिक शिक्षकांच्या प्रथमच राज्यस्तरावरून आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या. यामध्ये १३१ शिक्षक विस्थापित झाले, तर २१ शिक्षकांनी बदलीसाठी आॅनलाइन अर्जच दाखल केला नव्हता. त्यामुळे दोन्ही मिळून १५२ शिक्षकांना पदस्थापना देण्याचे नियोजन जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केले होते. अशातच १३१ विस्थापित शिक्षकांपैकी ५१ शिक्षकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी व शासनाला दिले आहेत. गुरुवारी ८० विस्थापित व २१ अर्ज न भरलेले अशा १०१ शिक्षकांना समुपदेशनद्वारा पदस्थापना देण्यात आली.जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात सीईओ मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षण सभापती जयंत देशमुख, उपशिक्षणाधिकारी वामन बोलके यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण) व विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.अनेकांना मेळघाटात नियुक्तीविस्थापित शिक्षकांच्या समुपदेशन प्रक्रियेत बहुतांश शिक्षकांना मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यात रिक्त असलेल्या जागांवर पदस्थापना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विस्थापित शिक्षकांमध्ये पुरुषांपेक्षा महिला शिक्षकांचाच अधिक समावेश होता. आज घेण्यात आलेल्या विस्थापित शिक्षकांच्या समुपदेशन प्रक्रियेत ५१ शिक्षक वगळता, इतर शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्याचे सीईओ मनीषा खत्री यांनी सांगितले.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTransferबदली