शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

१०० श्रमिक पत्रकारांना मिळणार घरे

By admin | Updated: March 23, 2015 00:28 IST

समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी लेखणी झिजविणाऱ्या श्रमिक पत्रकारांसाठी खऱ्या अर्थाने आज 'गुडन्यूज' आहे.

अमरावती : समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी लेखणी झिजविणाऱ्या श्रमिक पत्रकारांसाठी खऱ्या अर्थाने आज 'गुडन्यूज' आहे. १०० श्रमिक पत्रकारांना म्हाडामार्फत घरे बांधून देण्याची हमी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली. विश्रामगृहात आयोजित पत्रकारांच्या गृहनिर्माण बैठकीत ते बोलत होते. बडनेरा मार्गावरील ७ हजार ५०० चौ.फु. क्षेत्रावरील जागा श्रमिक पत्रकार गृहनिर्माणसाठी प्रस्तावित आहे. याबाबतीतील जमिनीचा डीपी प्लॅनदेखील मंजूर झाला आहे. महानगरपालिका क्षेत्रातील बडनेरा मार्गावरील या जागेचे पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींना घेऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केल्या. सन २००९-२०१० मध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी गृहनिर्माण योजना राबविण्याचे जाहीर केले. सध्या अमरावतीमध्ये जवळपास विविध वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे यामध्ये २०० ते २५० च्या दरम्यान श्रमिक पत्रकार काम करतात, अशी माहिती प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी दिली. त्यांना घरे देण्यासाठी शासनाने जमीन उपलब्ध करुन द्यावी, यासाठी पत्रकार संघटनांनी निवेदन दिलेले होते. यावेळी म्हाडाचे मुख्याधिकारी एस.एस. साधवाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हाडाच्या गृहनिर्माण योजनांमध्येदेखील पत्रकारांसाठी घरांचा राखीव कोठा असतो. मात्र, अमरावती व अकोला महानगरपालिका क्षेत्रात २.५ चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) लागू झाल्यास प्रस्तावित जागेवर २ बीएचके, १ बीएचकेच्या प्लॅटची निर्मिती करता येणे शक्य आहे. म्हाडाकडे सध्या अकोली, बडनेरा येथील जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे यावेळी उपस्थित पत्रकार संघटना व त्यांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली. व चर्चेंतर्गत पुन्हा एकदा जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी शहरात उपलब्ध जागेची माहिती त्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते व उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे यांचेकडून घेतली. गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारांच्या घराचा मुद्दा चर्चेत असल्याने या बैठकीमध्ये त्यावर जलदगतीने कार्यवाही करण्यात येणार असल्याने श्रमिक पत्रकार बंधूंकडून आनंद व्यक्त केल्या जात आहे.