शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

ऊर्ध्व वर्धात १०० टक्के जलसाठा

By admin | Updated: September 15, 2015 00:06 IST

जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी दिली असली तरी मध्य प्रदेशात पाऊस झाल्याने पाण्याचा येवा वाढला.

अमरावती : जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी दिली असली तरी मध्य प्रदेशात पाऊस झाल्याने पाण्याचा येवा वाढला. त्यामुळे सोमवारी उर्ध्व वर्धा धरणात १०० टक्के जलसाठ्याची नोंद झाली. प्रकल्प पूर्ण भरल्याने अमरावती शहरासह १०० गावांच्या पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळाला आहे. तसेच मोर्शी, तिवसा, चांदूररेल्वे व धामणगाव तालुक्यामध्ये रबीच्या पिकांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. जिल्ह्यात एकमेव मुख्य प्रकल्प असणाऱ्या उर्ध्व वर्धा धरणाची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त जलसाठा ५६४.०५ दलघमी इतका असून पूर्ण संचयन पातळी ३४२.५० मीटर आहे. या तुलनेत १४ सप्टेंबर रोजी ३४२.५० मीटर जलसाठा आहे. हा जलसाठा ५६४.०५ दलघमी इता म्हणजेच १०० टक्के आहे. जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी शहानूर प्रकल्पातील प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त जलसाठा ४६.०४ दलघमी असून पूर्णसंचय पातळी ४४९.५० मीटर आहे. त्या तुलनेत ४४७.०३ मीटर आजचा जलसाठा आहे. हा उपयुक्त जलसाठा ३९.१९ दलघमी असून याची टक्केवारी ८५.१२ इतकी आहे. चंद्रभागा प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त जलसाठा ४१.२५ दलघमी आहे व पूर्णसंचय पातळी ५०६.२० मीटर आहे. त्या तुलनेत सद्यस्थितीत ५०३.४५. मीटर स्थिती जलाशयाची आहे. हा उपयुक्त जलसाठा ३२.९६ दलघमी इतका असून हा जलसाठा ७९.९० टक्के जलसाठा असल्याची नोंद आहे. ९६ तासांत जोरदार पावसाची शक्यताकोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात येत्या ९६ तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. विदर्भात १५ सप्टेंबरपासून ९६ तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३५ दिवसांच्या प्रदीर्घ खंडानंतरही पाऊस पडल्यास शेतीपिकांना संजीवनी मिळणार आहे.